जगदीश पाटील मैदानात, शहर उत्तर विधानसभा लढवण्यासाठी पक्षाकडे केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ २०२४ साठी लिंगायत समाजाचे नेते माजी नगरसेवक जगदीश पाटील यांनी भाजपा शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांच्या कडे आगामी होणारे विधानसभेचे उमेदवारी मिळावे यासाठी निवेदन अर्ज दिले याप्रसंगी पक्षाचे प्रमुख नेते पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
शहर उत्तर चे विद्यमान आमदार तथा माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या शहर उत्तर मध्येच भाजपचे पक्षातील अनेक जण इच्छुक असल्याचे पहावयास मिळते. त्यामध्ये माजी महापौर शोभाताई बनशेट्टी, माजी सभागृह नेते सुरेश पाटील, भाजप पदाधिकारी चन्नवीर चिठ्ठे, आता भाजप नेते तथा माजी नगरसेवक जगदिश पाटिल हि उत्तरच्या निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आगामी शहर उत्तर विधानसभा निवडणुकीस मी इच्छुक असून मला उमेदवारी मिळावी अशी मागणी जगदीश पाटील यांनी भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना निवेदनाद्वारे पक्षाकडे केली आहे.