भाजपाने नानाभाऊ च्या विरोधात आंदोलन करण्याऐवजी आत्मचिंतन करावे : प्रा कुलकर्णी

सोलापूर : प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीने सोलापूर सह राज्यात वेगळ्या ठिकाणी नानाभाऊ पटोले यांच्या पाय धुणे संदर्भातल्या विषयाच्या विरोधात आज आंदोलन केले यावर प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा काकासाहेब कुलकर्णी यांनी भाजपच्या नेत्यावर सडकून अशी टीका केली ते असे म्हणाले, की भाजपाने आंदोलन करण्याऐवजी स्वतःचे 23 चे 09 खासदार का झाले.? यावर आत्मचिंतन करावे त्यावर सखोल असा अभ्यास करावा. नानाभाऊ नि 1 चे 13 खासदार महाराष्ट्रात करून दाखवले. त्याचा राजकीय अभ्यासाचा आदर्श भाजपाने घ्यावा परंतु वैफल्यग्रस्त झालेल्या भाजप नें उगीचच आंदोलन करून स्वतः वैफलग्रस्त असल्याचे महाराष्ट्रातल्या जनतेला दाखवून दिले आहे.
काल अकोला जिल्ह्यातील वाडेगाव या ठिकाणी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांची पालखी आली असता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले हे वारकऱ्या समावेश त्या ठिकाणी दर्शन घ्यायला गेले होते परंतु पावसाने चिखल झाल्याने नानाभाऊंचे पाय चिखलाने माखल्याने कार्यकर्त्याने पाणी आणून दिले परंतु नानाभाऊ स्वतःचे पाय स्वतः धुतले. असे असताना देखील जाणीवपूर्वक प्रसिद्धी मिळवण्याचा केविलवाना प्रयत्न भाजपा करत आहे.
लोकसभेच्या निवडणुकीत ज्या पद्धतीने नानाभाऊ पटोले यांनी महाराष्ट्रात भाजपचा सुफडा साफ केला त्याच पद्धतीने आता राज्यात सुद्धा महाविकासाघाडीचे सरकार नानाभाऊ आणतील याची भीती भाजपाच्या मनात असल्याने ते आंदोलन करत असल्याची सडकून टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी केली आहे.