हिंदुराष्ट्र सेनेकडून विधानसभेसाठी बुधवारी भव्य मेळावा, राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
हिंदुराष्ट्र सेनेकडून आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रात व्यापक बैठका व भव्य मेळावे घेण्यात येत आहेत. त्याच अनुषंगाने सोलापुरात बुधवारी दिनांक ९ आक्टोंबर रोजी सायं. ७ वाजता भव्य मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यासाठी हिंदुराष्ट्र सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे.
अशोक चौक येथील चिप्पा भाजी मंडई जवळील लोटस मंगल कार्यालयात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी शहर उत्तर, शहर मध्य, दक्षिण सोलापूर अशा तीनही मतदार संघातून मोठी उपस्थिती राहील याची जोरदार तयारी सुरु असल्याचे शहरप्रमुख रवि गोणे यांनी सांगितले. या मेळाव्यामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत हिंदुराष्ट्र सेनेची काय भूमिका असेल याविषयी राष्ट्रीय अध्यक्ष धनंजयभाई देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
हिंदुराष्ट्र सेनेकडून यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी मोठी तयारी करण्यात येत असून संघटनेचे सगळ्यात जास्त पदाधिकारी असलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघावर हिंदुराष्ट्र सेनेने विशेष लक्ष केंद्रित केल्याचे शहरसंघटक आनंद मुसळे यांनी सांगितले. या मेळाव्यात विधानसभा मतदारसंघानिहाय नूतन पदाधिकाऱ्यांची निवडही होणार आहे.
याप्रसंगी विलास पोतू, श्रीकांत सुरवसे, रोहन सोमा, प्रकाश आसादे, अभिजित अरळीकर, विजय गोणे, सागर कोळी, ओंकार दोडतले, अक्षय पाटील, अभिषेक झेंडगी, नागेश सुळगावकर, उदय रापोल आदी उपस्थित होते.