शहर मध्य साठी आणखी एक शिवसैनिक इच्छुक, उमेदवारीची उद्धव ठाकरेंकडे केली मागणी, निष्ठावंतांना न्याय द्या
शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून विष्णू कारमपुरी यांनी उद्धव ठाकरे कडे उमेदवारीची केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना सोलापूर शहर महानगर प्रमुख व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी यांनी मातोश्री बंगला येथे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना निवेदनाद्वारे शहर मध्य ची उमेदवारी मिळावी अशी मागणी केली आहे. सध्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदार संघात उमेदवारीसाठी महाविकास आघाडी कडून सर्वच पक्षाचे इच्छुकांची रस्सी खेस सुरू आहे.
अशात जुने शिवसैनिक, निष्ठावान शिवसैनिक, पक्षाच्या संकट काळात ठाकरे कुटुंबीयांसोबत असलेले बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे बिडी कामगारांसाठी न्याय मिळवून दिलेले आणि मा साहेब मीनाताई ठाकरे विडी कामगार गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्याच अनुदानातून पाच हजार घरांची प्रकल्प पूर्ण केलेले. त्याच बरोबर संघटनेच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून येणाऱ्या आंदोलनात सक्रिय सहभागी असणारे एक धडाडीचे शिवसैनिक म्हणून ओळख असलेले विष्णू कारमपुरी यांनी मागणी केली.
शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना विष्णु कारमपुरी म्हणाले, मी 35 वर्ष झाले शिवसैनिक कट्टर शिवसैनिक आहे आणि मी अध्यापि तुम्हाला काही मागितलं नाही मला या वेळेला शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी अशी मागणी केली. सदर प्रसंगी उपशहर प्रमुख अनिल दंडगुळे, युवती सेनेचे शहर संघटिका रेखा आडकी, शहर मध्य विधानसभा संघटक अमित भोसले, विभाग प्रमुख यल्लाप्पा, महिला आघाडीच्या उपशहर प्रमुख राधिका आडकी, राधा दंडगुळे आधी उपस्थित होते.