खासदार प्रणिती शिंदे यांनी करगुळे कुटुंबीयांचे केले कौतुक, कोनापुरे चाळीतील भाडेकरूंचा प्रश्न सोडवणार
प्रभाग क्रमांक 15 क येथे कोनापुरे चाळ, बुद्ध नगर फॉरेस्ट, न्यू तिर्हेगाव येथे बंच कडेक्ट केबल टाकण्याचा कामाचा शुभारंभ

सोलापूर : प्रतिनिधी
नूतन खासदार प्रणिती शिंदे यांच्या निधीतून माजी नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्र १५ क कोनापुरे चाळ बुद्ध नगर फाँरेस्ट न्यू तिर्हेगाव येथे बंच कडेक्ट केबल टाकण्याचा कामाचा मोची समाजाच्या जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे यांचा अध्यक्षतेखाली शुभारंभ खासदार प्रणिती शिंदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत बाबा ग्रुपचे संस्थापक अंबादास करगुळे यांनी केले व तसेच सोलापूर लोकसभेतून पहिला महिला खासदार म्हणून निवडून आल्याबद्दल खासदार प्रणिती शिंदे यांचा नगरसेविका वैष्णवीताई अंबादास करगुळे व कोनापुरे चाळ वतीने भव्य सत्कार करण्यात आले.
या कार्यक्रम वेळी स्मार्ट सिटी योजनेतून नित्कृष्ट दर्जेचा ड्रेनेज लाईनचा कामामुळे नळाला पाणी आले तरीसुद्धा घरात पाणी शिरते हे पाणी बंद होण्याकरिता आपल्या खासदार निधीतून नवीन ड्रेनेज लाईन घालून द्यावे व तसेच कोनापुरे चाळीतील विविध प्रश्न व भाडेकरूंचा प्रश्न आपण लवकरच लवकर सोडवावी व प्रभाग क्रमांक 15 मधील विविध विकास कामासाठी आपल्या खासदार निधी जास्तीत जास्त देऊन सहकार्य करावे असे मागणी माजी नगरसेविका वैष्णवी करगुळे यांनी केले.
यावेळी खासदार प्रणिती शिंदे म्हणाले, की मी खासदार झालो तरी काय झालं प्रभाग क्रमांक 15 असो किंवा कोनापुरे चाळ असो या भागातील कुठल्याही प्रश्न असो मी ते सोडविणेसाठी कायम तुमचा सोबत राहील कोनापुरे चाळीतील भाडे करूचां प्रश्नासाठी मी जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्त यांच्या सोबत लवकर बैठक बोलवण्यात येईल व तसेच पाणी ड्रेनिज व विविध कामासाठी मी माझा खासदार निधीतून जास्तीत जास्त निधी देण्याचा प्रयत्न करते असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी माजी महापौर संजय हेमगड्डी, काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रा नरसिंह आसादे, गृहनिर्माण संस्थेचे चेअरमन बसवराज म्हेत्रे, कोनापुरे चाळचे अध्यक्ष शिवराम जगले, रंगप्पा मरेड्डी, माजी नगरसेवक मनोज यलगुलवार, काँग्रेसचे कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळू, सिद्राम कामाठी, नागनाथ कासलोलकर, दिनेश म्हेत्रे, रथोत्सव अध्यक्ष रवी आसादे, रामस्वामी मनलोर, नागू मामा म्हेत्रे, रामकृष्ण पल्ले सिध्दलिंग तुपदोळकर मल्लू बाबा म्हेत्रे शंकर म्यगेरी शंकर मार्गेल लक्ष्मण आसादे प्रशांत करगुळे मल्लू सरपंच म्हेत्रे संजय भंडारे लक्ष्मण आसादे अर्जुन साळवे नागेश म्हेत्रे डॉ. योगेश पल्लेलु यल्लाप्पा तुपदोळकर अशोक सायबोळू आनंद पलोलु विश्वनाथ म्हेत्रे याकोब करमोळु विश्वास नागटिळक सागर शेंडगे सिद्धांत रंगापुरे विजय म्हेत्रे उत्कर्ष बोतांलेलु व कोनापूरे चाळ येथील बहुसंख्य नागरिक व महिला व युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अंबादास नाटेकर यांनी केले.