क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

मोहोळ पोलीस ठाणेकडील डी.बी. पथकाची कामगिरी, बस स्टॅडवर प्रवाशांचे दागीणे व पैसे चोरणा-या महीलेस जेरबंद

सोलापूर : प्रतिनिधी

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापुर ग्रामीण यांनी मोहोळ पोलीस ठाण्याची वार्षिक तपासणी घेतली होती. त्यामध्ये मोहोळ पोलीस ठाणे कडील तपास पथकाला (डी.बी.) माला विशयक गुन्हे उघडकीस आणनेकरीता आदेशीत केले होते.

मागील काही दिवसामध्ये जिल्हयातील एस. टी. स्थानकावर प्रवाशांचे दागीणे व पैसे चोरीचे गुन्हे घडले होते. सदर गुन्हयाची उकल करण्यासाठी संकेत देवळेकर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली सुरेशकुमार राउत, पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे यांनी अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळे पथके तयार करुन बस स्थानकावर लक्ष केंद्रीत करुन बस स्टॅडवरील चोरीचे गुन्हे उघडकीस आणनेकामी मार्गदर्शन करुन सुचना दिल्या होत्या. त्या प्रमाणे मोहेाळ पोलीस ठाणेकडील डी.बी. पथक रेकॉर्डवरील पाहीजे आरोपीचा शोध घेणेकामी मोाहेाळ बस स्टॅडवरती हजर असताना डीबी पथकातील पोहेकॉ/ दयानंद हेंबाडे यांना गोपणीय बातमी मिळाली की, उदगीर ता उदगीर जि लातुर येथील राहणा-या दोन महीला हया सोलापुर ग्रामीण येथे वेगवेगळया तालुक्यात जावुन तेथील बस स्थानकारवर जावुन गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे दागीणे व पाकीटे चोरी करण्याच्या सवई च्या असुन ती सध्या मोहोळ बसस्थानकावर प्रवाशांचे पाकीटे व दागीणे चोरी करण्यासाठी वावरत असल्यसाची खात्रीशीर बातमी मिळाली.

त्या प्रमाणे डीबी पथक मोहोळ बसस्थानकावर जावुन बातमी प्रमाणे तेथे वावरत असलेल्या दोन महीलांना पथकातील महीला कर्मचारी मपोकॉ/ललीता हलसंगी यांनी त्यांना ताब्यात घेतल्या नंतर त्यांना नाव पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव 1) शोभाबाई माणिक वाघमारे, वय 55 वर्शे, रा वडारगल्ली, सोमनाथ रोड, उदगीर ता उदगीर जि लातूर 2)सुनिता शेषराव सकट, वय 50 वर्शे, रा गांधीनगर,ता उदगीर, जि लातुर असे असल्याचे सांगीतले. त्यांच्याकडे अधिक विचारपूस करता त्यांनी उडवा उडवीची उतरे देवूु लागल्या त्यावर त्यांचेवर अधिक संशय आल्याने त्यांना विश्वासात घेवुन विचारपुस करता त्यांनी सांगीतले की ती सदर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवुन प्रवाषांचे दागीणे व पाकीटे चोरी करण्या करीता आल्याचे सांगीतले. त्या वरुन त्यांचेकडे सोलापुर ग्रामीण जिल्यातील एस टी स्थानकावर घडलेल्या गुन्हयाचे अनुषंगाने तपास करता त्या दोन महीलांनी मोहोळ बस स्थानकावर आठ वेळा तसेच पंढरपुर बस स्थानकावर एक वेळा व बार्शी बस स्थानकावर तीन वेळा बस स्थानकावर गर्दी चा फायदा घेवुन प्रवाशांचे दागीणे व पाकीटे चोरी केल्याचे कबुल केले. त्यांचे कडे अधिक तपास करता पुढील गुन्हे केल्याची कबूली दिली असून त्यातील चोरी केलेला मुद्देमाल काढून दिला आहे.

एकुण 12 गुन्हे उघडकीस आणुन सदर गुन्ह्यातील एकूण 260 ग्रॅॅम (26 तोळे) वजनाचे सोन्याचे दागीणे व 14,950/-रु रोख रक्कम असा 20,16,950 रु एवढ्या किंमतीचा मुदेमाल जप्त केला आहे. सदर ची कामगीरी हि पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर सोलापुर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राउत यांचे नेतृत्वाखाली पोहेकॉ/दयानंद हेंबाडे, पोना /चंद्रकांत ढवळे, पोका/सिध्दनाथ मोरे, पोका/अजित मिसाळ, पोकॉ/स्वप्नील कुबेर, पोकॉ/अमोल जगताप, पोकॉ/अविराज राठेाड, पोकॉ/संदीप सावंत, मपोकॉ/ललीता हलसंगी, सायबर पोलीस ठाणेकडील पोहेकॉ/युसूफ पठाण यांनी बजावली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!