सोलापूर
बाळासाहेब पवार यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी, तुळजापुरला ज्योत घेऊन चालत जाणाऱ्या भक्तांसाठी केले फराळाचे वाटप

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र रिक्षा सेना सोलापूर शहर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात तुळजापूरला पायी ज्योत घेऊन येणाऱ्या आणि जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी उपवासाचे साहित्य वाटप करण्यात आले.
महाराष्ट्र रिक्षा सेना वतीने सोलापूर शहर चालक-मालक संघटना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट रिक्षा सेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब पवार, दिनेश सरवळे, दत्ता शहापुरे, अशोक चव्हाण व इतर शिवसैनिक उपस्थित होते तुळजापूर वरून ज्योत घेऊन येणाऱ्या भक्तांना फराळाचे साहित्य वाटप रिक्षा सेनेतर्फे करण्यात आले.
यावेळी अण्णा गवळी ,उपशहर प्रमुख पिंटू माने आणि रिक्षा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.