सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

अधिकाराचा गैरवापर करून एकाची फसवणूक, चौघांविरुद्ध दाखल झालेल्या गुन्हात अंतरिम आटकपुर्व जामीन मंजुर

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर हद्दवाढ भागातील मजरेवाडी येथील बिनशेती खुली जागे- वरील अर्जदारांचे नाव कमी न करता, परस्पर मोजणी करुन या मिळकतीचा सात बारा उताऱ्याची पोट हिस्से तयार करुन चौघांनी अधिकाराचा गैरवापर करुन इतर मिळकत धारकांना त्याचा फायदा करुन दिल्याची घटना घडली आहे.

ही घटना १४/१०/२०२२ रोजी ते दि. ०९/११/२०२३ रोजी पर्यंत, उपअधिक्षक भुमी अभिलेख, ता. उत्तर यांचे कार्यालयात, जुने जिल्हाधिकारी कार्यालय, सोलापूर येथे घडली. सुनिल वसंतराव पोतदार (वय-६४, रा. घर नं. ५२५, शुक्रवार पेठ, सोलापूर) यांच्या फिर्यादीवरून नितीन सावंत, तबस्सुम सय्यद, मुकुंद काडगावकर, श्रीशैल काळे या चौघाविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिताचे कलम- 120-बी,166,166-ए,420,465,466,471 सह-34 प्रमाणे ता.26-11-2024 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

यात अधिक हकिकत अशी की, फिर्यादी सुनील पोतदार यांनी सोलापूर हद्दवाढ भागातील मजरेवाडी येथील बिनशेती खुली जाग सव्र्व्हे नं. ३०६/१ यास नवीन सर्व्हे नं. १५४/१, या जागेचे एकुण क्षेत्र ०४ हे ७६ आर या मिळकतीवर फिर्यादी व फिर्यादीचे पाच चुलत भाऊ असे एकुण ६ जणांचे वारसाहक्काने मालकीचे संदर्भात अर्जदार यांचे नाव कमी का झाले नाही यांची कोणतीही खातरजमा केली नाही. तसेच – अर्जदार यांना मोजणी प्रकरणाची कोणतीही कल्पना अथवा नोटीस न देता अर्जदार यांचे गैरहजर नमुद मिळकतीचा परस्पर मोजणी करुन या मिळकतीचा सात बारा उताऱ्याची पोट हिस्से तयार करुन वरील चौघांनी अधिकाराचा गैरवापर करुन इतर -मिळकत धारकांना त्याचा फायदा करुन दिला आहे अशी फिर्याद दिली होती.

त्यामध्ये आटक होईल या भितीने त्यांनी आटक पुर्व जामीनाकरीता मे.सेशनकोर्टात अर्ज ठेवला होता मे.सेशन जज्ज जे जे मोहिते यांनी 02 डिसेंबर 2024 रोजी अंतरिम आटकपुर्व जामीन मंजुर केला. यांत तबसुम मुल्ला यांच्या वतीने ॲड डी एन भडंगे, ॲड एन एन भडंगे यांनी काम पाहिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!