सोलापूरक्राईममहाराष्ट्रसामाजिक

अतुल कुलकर्णी यांचा Coffee and conversation with Industrialist संवाद कार्यक्रम यशस्वी, उद्योजकांनी मानले आभार

सोलापूर : प्रतिनिधी

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवले जातात. त्यामध्ये 13 फेब्रुवारी 2025 रोजी सायंकाळी 17.00 वाजता Coffee and conversation with Industrialist हा कार्यक्रम घेण्यात आला आहे.

पोलीस मुख्यालय, सोलापूर ग्रामीण येथील ‘‘संवाद हॉल’’ येथे सोलापूर जिल्ह्यामधील MIDC मधील कारखानदार व उद्योजक यांना त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी आंमत्रीत करण्यात आले होते. त्याप्रमाणे जिल्हयातील उद्योजक Coffee and conversation with Industrialist या संकल्पनेखाली कार्यक्रमासाठी हजर होते. यावेळी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक व प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक यांनी हजर उद्योजक यांचेषी खुली चर्चा केली व त्यांच्या अडअडचणी समजून घेतल्या. तसेच त्यावर तात्काळ कृती करण्याचे आश्वासित केले. या चर्चेत सुरक्षा, वर्गणी मागणी व चोरी संदर्भात चर्चा केली. आगामी काळामध्ये येणारे सण व उत्सव दरम्यान उत्सव मंडळाकडून जबरदस्तीने वर्गणी मागणी केली जात असल्याबाबत निदर्शनास आणून देण्यात आले. त्यावेळी पोलीस अधीक्षकांनी अशा उत्सव मंडळावर कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबत आश्वासित करण्यात आले आहे.

तसेच कारखान्यामध्ये काम करण्यासाठी परप्रांतीय कामगार येत असतात अशा कामगारांचे चारी॰य पडताळणी सुकर व्हावी याबाबतची मार्गदर्शन केले. त्यांनतर मा. पोलीस अधीक्षक यांनी उद्योजक व पोलीस यांची पर्यावरणबाबतची सामाजीक जबाबदारी याबद्लही सखोल चर्चा केली.

यामध्ये कारखानदारीतून निर्माण होणारे हवेच्या प्रदुशणाबाबत अमोल चाफेकर यांनी हवेतील प्रदुषण कमी करण्यासाठी प्रझेंटेषन सादर केले. सोलापूर जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याबाबत हजर असलेल्या उद्योजकांना आवाहन केले. तसेच सेंद्रीय शेती चळवळ ही सुध्दा सोलापूर जिल्ह्यामध्ये राबविण्याबाबत मार्गदर्शन केले.       

सदरवेळी अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण, प्रितम यावलकर, अपर पोलीस अधीक्षक, सोलापूर गामीण, जिल्यातील सुमारे 90 ते 100 कारखानदार व उद्योजक हजर होते. सदर कार्यक्रम पार पडण्यासाठी पोनि अतुल मोहीते, वेलफेअर शाखा व अंमलदार यांनी विषेश परिश्रम घेतले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!