राजन जाधव आक्रमक, मराठा समाजाच्या आडवे याल तर हाकेला आडवे करू म्हणत दिला इशारा

सोलापूर : प्रतिनिधी
काल सोशल मीडियावर लक्ष्मण हाके याचे दारू पिलेला कथित व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आज सोलापुरात मराठा समाजाच्या वतीने हाके विरोधात जोडे मार आंदोलन करण्यात आले. हाके यांच्या फोटोला चप्पलीचा घातलेल्या हार आणि शेजारी दारूची बाटली असलेल्या पोस्टरला मराठा समाजाकडून जोडे मार आंदोलन केले. यावेळी हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी मराठा बांधवांनी दिली.
लक्ष्मण हाके यांनी नावापुढे प्राध्यापक पदवी न लावता बेवडा ही पदवी लावावी. मराठा समाजाच्या आडवा येणाऱ्या हाकेला मराठा समाज आडवा करेल. सरकार मधील काही लोकांच्या सपोर्टमुळे हाके मराठा समाजाला आडवा येण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र यापुढे मराठा समाजाला आडवे येणाऱ्याला मराठा समाज आडवे करेल असा इशारा सकल मराठा समाज समन्वयक राजन जाधव आणि प्रा गणेश देशमुख यांनी दिला.
यावेळी सकल मराठा समाज समन्वयक राजन जाधव, प्रा गणेश देशमुख, माऊली पवार, महादेव गवळी, चंद्रकांत पवार, वामन वाघचौर, विष्णू जगताप, शाम गांगुर्डे, संदीप काशीद, लहू गायकवाड, दादा गांगुर्डे, ईश्वर अहिरे, बाळासाहेब घुले, विजय घुले, नागनाथ पवार, बाळासाहेब पवार आदींसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.