“बाबा सिर्फ नाम हि काफी है”, अंबादास करगुळेनी मागितली शहर मध्यची उमेदवारी, सुशिलकुमार शिदेंचा घेतला आशिर्वाद, केले शक्ती प्रदर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024, 249 सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून सोलापूर शहर युवक काँग्रेस माजी अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकित काँग्रेस पक्षाकडून रितसर उमेदवारी मागणीचा अर्ज सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे काँग्रेस भवन सोलापुर येथे सूपूर्त केला.
यावेळी त्यांचे शेकडो मोची समाज बांधव, समाजाचे विभागीय अध्यक्ष व युवक वर्ग व नागरीक उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सचिव नरसिंग आसादे, अभ्यासु माजी नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे, माजी चेअरमन सिद्राम अट्टेलुर, उपाध्यक्ष नागनाथ कासलोलकर, कॉंग्रेस कार्याध्यक्ष हणमंतु सायबोळू, माजी अध्यक्ष बसवराज म्हेत्रे, दिनेश म्हेत्रे, बाबु विटे, रवि आंबेवाले, माजी अध्यक्ष यलप्पा तुपदोळकर, जांबमुनी मोची समाज लष्कर अध्यक्ष करेप्पा जंगम, पाच्छापेठ मोची समाज अध्यक्ष सुरेश भंडारे,
फॉरेस्ट अध्यक्ष शिवराम जगले, मधुकर उपलवस्ती, अध्यक्ष अर्जुन साळवे, ईरण्णावस्ती अध्यक्ष ईश्वर म्हेत्रे, मोची समाज युवक अध्यक्ष रतिकांत कमलापुरे, विनायक ढाले, यलप्पा बुगले, तम्मा विटे, रवि म्हेत्रे, दत्तात्रय नामकर नागु म्हेत्रे सिद्राम करगुळे यलप्पा तुपदोळकर लक्ष्मण आसादे मल्लु बाबा म्हेत्रे मलेश अलझेडे उमेश म्हेत्रे तायप्पा बेरे प्रशांत करगुळे अजय मनलोर सागर भंडारे सुनिल बोदलोलु बालाजी दिवेकर भगवान करगुळे मल्लु संरपच म्हेत्रे शिवरत्न जोगळेकर दत्ता मंगासले धमदिप जगझाप श्रीनिवास परकीपंडला
आनंद भंडारे सिद्राम म्हेत्रे दत्ता करगुळे शिवा म्हेत्रे वेदु म्हेत्रे नागेश साखरे कृष्णा पलोलु मारूती बेरे बालु करगुळे संजय गायकवाड उमेश निलंगठी सुभाष वाघमारे बाबा ग्रुप अध्यक्ष जितेश मासे आदी मोची समाजातील असंख्य युवक बाबा ग्रुप कोनापुरे चाळीतील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
मोची समाजाचे सुपुत्र व माजी युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास उर्फ बाबा करगुळे व अभ्यासु माजी नगरसेविका वैष्णवी अंबादास करगुळे यांनी मुंबई येथे जाऊन माजी केंद्रिय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांची भेट घेतली. 2024 मध्ये होणाऱ्या शहर मध्य विधानसभा मधुन मी इच्छुक उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाकडून अधिकृत अर्ज केलो म्हणुन सांगुन साहेबांचे आशीर्वाद घेतले.