सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक

विधानसभा निवडणुकीची अचारसंहिता लागल्या नंतर मी मुख्य भूमिक जाहीर करणार : जरांगे पाटील

सोलापूर : प्रतिनिधी

हा जनसमुदाय न्यायाचा आहे. दु:खाकडून सुखाकडं जाण्यासाठी हा समाज एकत्र आला आहे. या सगळ्या समुदायावर एक संस्कार आहेत. हे कधीच जातीवाद करत नाहीत. या जनसमुदायाची प्रचंड संख्या आहे. पण हे कधीच मस्तीत आणि मग्रुरीत वागत नाहीत. तर, प्रत्येकाला सोबत घेण्याचं, साथ देण्याचं काम केलं आहे. त्यांना कधीच जात चिकटली नाही अशा शब्दांत मनोज जरांगे पाटीलयांनी आपल्या भाषणाची सुरूवात केली. ते दसरा मेळाव्यानिमित्त आयोजीत कार्यक्रमात नारायण गडावर बोलत होते. यावेळी लाखोंचा मराठा समाज येथे एकत्र झाल्याचं चित्र पाहायला मिळाल.

एकदा साथ देण्याचं ठरवल तर तुम्ही मागं हटत नाहीत. तसंच, ठरवल तर कार्यक्रमच करता असं म्हणत लोकसभेला समाजाने कशी योग्य भूमिका घेतली असं जरांगे पाटील यावेळी म्हणाले आहेत. कुणीतरी सांगा आम्हाला नक्की आम्ही काय केलं आहे. आमची चूक काय आहे. रक्ताच पाणी करून आम्ही संघर्ष केला आहे. माझा समाज हा महाराष्ट्र आणि देश पुढे जाण्यासाठी लढला आहे. तलवारी घेऊन आम्ही संघर्ष केलाय. आमच्या माना तुटल्या आणि न्याय तुम्हाला मिळालाय. मग आम्हला सांगा नक्की आमचं चुकलय काय? असा प्रश्न उपस्थित करत जरांगे पाटील यांनी थेट प्रश्न केले आहेत.

कुणी जहागिरदार आला तरी झुकायचं नाही असं म्हणत उपस्थित जनतेमध्ये एक हुंकार जरांगे पाटील यांनी दिली आहे. तसंच, जर आपल्यावर अन्याय होत असेल तर आपल्याला यांना उखडून फेकावच लागणार आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत. आज तुम्ही जे जमलात तेच उद्या यांना उखडून फेकणार आहात. त्यामुळे आता सुट्टी नाही असं म्हणत जरांगे पाटील यांनी थेट सरकारला आव्हान दिलं आहे. तसंच, विधानसभा निवडणुकीची अचारसंहितेनंतर लागल्यानंतर मी मुख्य भूमिक जाहीर करणार आहे असंही जरांगे पाटील म्हणाले आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!