पार्क चौपाटीवरील शमी वृक्षाजवळ सिमोल्लघन, आपट्याची पाने एकमेकांना देत दिल्या दसऱ्याच्या शुभेच्छा

सोलापूर : प्रतिनिधी
पार्क चौपाटी येथील शमी वृक्षाजवळ सीमोल्लंघनासाठी जत्रेचे स्वरूप आले होते. ‘आई राजा उदे उदे, सदांनदीचा उदे उदे” च्या गगनभेदी घोषणांनी सारा आसमंत दणाणून गेला होता. सोलापूरची श्री रूपाभवानी देवी पालखी मिरवणूक सिद्धेश्वर महाराज नंदीध्वज मिरवणूक व सीमोल्लंघनासाठी आलेल्या सोलापूरकरांची अलोट गर्दीने चोपाटी परिसर फुलला होता.
शमीच्या वृक्षाभोवती प्रदक्षिणा घालून सोने लुटण्यात आले. पूर्वापार परंपरेनुसार ग्रामजोशी मंडळींनी शमीच्या वृक्षाची पूजा करून भाविकांना सोने वाटले. सीमोल्लंघनानंतर सद्भावनेचे प्रतीक समजल्या जाणाऱ्या आपट्यांची पाने एकमेकांना देऊन नागरिक दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा देत होते. या वेळी नागरिकांची प्रचंड गर्दी उसळली होती.
साडेतीन मुहूतपैिकी एक मुहूर्त समजल्या विजयादशमीनिमित्त जाणाऱ्या वाहने, दूरचित्रवाणी संच, फ्रीज, मोबाइल संच, संसारोपयोगी वस्तू यासह सोने, चांदी खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसून आली. विजयादशमीदिनी सोन्याचा भाव १० ग्रॅमला ७६ हजार २९० रुपये एवढा तर चांदीचा प्रतिकिलो दर ९१ ते ९३ हजारांच्या घरात होता.