सोलापूरमहाराष्ट्रसामाजिक

सोलापूरकरांचा थाळीनाद आंदोलनात उस्फुर्त सहभाग, पाण्याचा दिवस कलंक पुसण्यासाठी एल्गार

महिन्याभरात पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास छेडणार तीव्र आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी

सोलापूर विकास मंचच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सर्व सोलापूरकरांनी सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभाराच्या निषेधार्थ सोलापूरकरांनी रविवार दिनांक २६ मे २०२४ रोजी सकाळी ठिक १० वाजता स्वतःच्या घरातुन थाळीनाद आंदोलन करुन उत्स्फूर्तपणे सहभाग घेत निषेध नोंदविला.

सदर आंदोलनाची दखल केंद्र, राज्य आणि स्थानिक पातळीवर घेण्यात आली असुन, सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचे स्विय्य सह्यायकांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांसह ह्या गंभीर समस्ये विषयी येत्या आठवडय़ात बैठक घेण्याचे कळविले आहे.

३६५ दिवसांचा महानगरपालिका कर भरुनही जेमतेम १०० दिवस अवेळी, अनियमित, गढुळ, दुर्गंधी युक्त दुषित पाणीपुरवठा सोलापूर महानगरपालिका अनेक वर्षांपासून करीत आहे. उजणी धरण उराशी असुनही सोलापूरकरांना हा भोग भोगावा लागतोय.

१२३ टिएमसी धरण क्षमता प्रती वर्षीं भरते आणि सोलापूर शहरास प्रतिवर्षी जेमतेम केवळ ०३ टिएमसी पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असुनही सोलापूर महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोलापूरकरांना पाण्याचा दिवस म्हणून मरणयातना भोगाव्या लागत आहे.

सोलापूरच्या पाण्याच्या ह्या गंभीर समस्येमुळे सोलापूरात मोठ्या इंडस्ट्री, आय.टी. कंपन्या गुंतवणूक करण्यासाठी धजावतात. दुहेरी जलवाहिनीमुळे सोलापूरचा पाणीपुरवठा व्यवस्थित होईल हा एक भ्रम असुन, सोलापूर महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाचे नियोजनशुन्य कारभार तथा स्काडा हा संपूर्णपणे फसव्या प्रयोगाला सोलापूरची जनता वैतागली आहे.

सोलापूर विकास मंचच्या आवाहनास प्रतिसाद देत सर्व सोलापूरकरांनी स्वतःच्या घरातुन थाळीनाद आंदोलन करुन सोलापूर महानगरपालिकेचा निषेध नोंदविला, येत्या महिन्याभरात सोलापूरचे पाणीपुरवठा सुरळीत न झाल्यास ह्याहुन अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सोलापूर विकास मंचच्या वतीन मिलिंद भोसले यांनी दिला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!