शहर मध्य ची जागा शिवसेनेला सोडावी अन्यथा शहर जिल्ह्यातील भाजपचे पाच उमेदवार पाडू : अमोल शिंदे
आता नाही तर कधीच नाही, संघर्षा शिवाय पर्याय नाही असे म्हणत एकनाथ शिंदे यांची शिवसेना आक्रमक

सोलापूर : प्रतिनिधी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने पत्रकार परिषद घेत आता नाही तर कधीच नाही, संघर्षा शिवाय पर्याय नाही, संघर्ष हा तर आमच्या रक्तातच असं म्हणत शहर मध्य ची जागा शिवसेनेला मिळावी अन्यथा भाजपाचे शहर जिल्ह्यातील पाच उमेदवार पाडू असा इशारा पत्रकार परिषदेतून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी दिला.
भाजपामध्ये नुकतेच प्रवेश केलेले देवेंद्र कोठे यांना उमेदवारी मिळणार अशी चर्चा सुरू आहे लोकसभेत आम्ही तन-मन-धनाने भाजपचे काम केले परंतु शहरातील तीन विधानसभापैकी उत्तर आणि दक्षिण हा भाजपकडे आहे मध्य शिवसेनेला मिळावा अन्यथा आमची भूमिका वेगळी असेल. असा दावा अमोल शिंदे यांनी केला.
उत्तर विधानसभेतून अमोल शिंदे, शहर मध्य म्हणून मनोज शेजवाळ, दक्षिण विधानसभेतून उमेश गायकवाड, मंगळवेढा पंढरपूर मतदारसंघातून अशोक खंदे, अक्कलकोट विधानसभेतून अभिजीत पाटील हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार असतील निवडणूक अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आम्ही सर्व अर्ज भरणार अशी माहिती अमोल शिंदे यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, शहर प्रमुख मनोज शेजवाळ, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले, तुकाराम मस्के, युवा सेना अध्यक्ष उमेश गायकवाड, सागर शितोळे, यांच्यासह महिला पदाधिकारी युवक पदाधिकारी उपस्थित होते.