अनंत जाधव आक्रमक, देवेंद्र कोठे यांच्या उमेदवारीला भाजप मधील इच्छुकांचा विरोध, नरेंद्र काळेना दिले पत्र

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहरातील अत्यंत चर्चिला जाणारा विधानसभा मतदारसंघ म्हणून शहर मध्य कडे पाहिले जाते जसजसं निवडणूक रंगात येत आहे तसतसं मद्य जी चर्चा मोठ्या प्रमाणात रंगली आहे खऱ्या अर्थाने सोलापूर शहर मध्य ची जागा भाजपाला सुटावी यासाठी भाजपचे पदाधिकारी प्रयत्न करत असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील हा मतदारसंघ सुटावा यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.
अनंत जाधव (भाजप शहर उपाध्यक्ष)
भाजपतील नेते अनंत जाधव, पांडुरंग दिंद्दी, अंबादास गोरटला, श्रीनिवास संगा यांनी एकत्र येत आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्यावी परंतु भाजपामध्ये आत्ताच प्रवेश केलेल्या देवेंद्र कोठे यांना उमेदवारी देऊ नये असे म्हणत भाजप कार्यालयात शक्ती प्रदर्शन करत शहराध्यक्ष नरेंद्र काळे यांना लेखी पत्र दिले आणि ते पत्र प्रदेशाध्यक्ष, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देखील पाठवले.
अंबादास गोरटला (भाजप युवा नेते)
भाजपा कार्यालयात शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मागणाऱ्या इच्छुकांनी देवेंद्र कोठेवर टीका करत एकीकडे काका शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उमेदवार आणि देवेंद्र कोठे शहर मध्य मधून उमेदवार हे असं चालणार नाही असं म्हणत चारी इच्छुकांनी सडकून टीका केली.
श्रीनिवास संगा (भाजप युवा नेते)
भाजपा कार्यालयात झालेल्या बैठकीवेळी भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, शहर उपाध्यक्ष अनंत जाधव, ज्येष्ठ नेते पांडुरंग दिंद्दी, माजी सभागृह येथे शिवानंद पाटील, अल्पसंख्यांक अध्यक्ष झाकीर सगरी, युवा नेते अंबादास गोरटला, श्रीनिवास संगा यांच्यासह युवा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.