अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून संतोषकुमार इंगळे इच्छुक, वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारीची केली मागणी

- सोलापूर : प्रतिनिधी
अक्कलकोट विधानसभा निवडणुकीची लढत ही तिरंगी होणार असून विद्यमान आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांचे टेन्शन वाढवणारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे.
वंचित बहुजन अघाडीच्या वतीने जिल्हातील सर्व जागा लढवण्याच्या दृष्ठीने चाचपनी झाली असून शासकीय विश्राम येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती नुकत्याच पार पडल्या आहेत. अक्कलकोट विधानसभेसाठी इच्छुक म्हणून अक्कलकोट तालुक्यातील कर्जाळ चे भूमिपुत्र आणि मुंबई येथील उद्धयोजक संतोषकुमार इंगळे यांनी उमेदवारीची मागणी केलीय.
अक्कलकोट येथील अनेक प्रश्नांचा अभ्यास करून ते सोडवण्याच्या दृष्ठीने संतोषकुमार इंगळे यांनी वंचित बहुजन आघाडीकडे उमेदवारी मागितली आहे. अक्कलकोट तालुक्यातील तरुणांचा पुणे, मुंबई, हैद्राबाद शहरांकडे नोकरीसाठी होणारे स्थलांतर असो किंवा ग्रामीण भागासह अक्कलकोट शहराला भेडसावणारा पाणी प्रश्न असो किंवा ग्रामीण भागातील रस्त्यांची झालेली चाळन असो आशा मूलभूत प्रश्नावर काम करण्याची त्यांची इच्छा असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघ वंचित बहुजन आघाडीकडून इच्छुक संतोषकुमार इंगळे यांनी अधिक माहिती दिली.