उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या समवेत चर्चा करून चाळीचा प्रश्न मार्गी लावू देवेंद्र कोठे यांची ग्वाही, दिलीप कोल्हे यांच्या वतीने मिल कामगारांच्या मुलांसमवेत दिवाळी साजरी

सोलापूर : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीने मिल कामगारांच्या मुलांसमवेत दीपावली उत्सव साजरा करण्यात आला. यावेळी सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे, कार्यक्रमाचे आयोजन तथा शिवसेना शहर समन्वयक, माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे, शिवसेना महिला आघाडीच्या शहराध्यक्ष जयश्री पवार, उपशहर प्रमुख मनीषा नलावडे, वैद्यकीय कक्ष समन्वयक जवाहर जाजू, कामगार आघाडीचे शहराध्यक्ष सायबन्ना तेगेहेल्ली, युवा सेनाप्रमुख अर्जुन शिवसिंगवाले, मीडिया प्रमुख नेहाल शिवसिंगवाले, उप महिला प्रमुख अनिता गवळी, सुनंदा साळुंखे, भाजप शहर चिटणीस शेखर फंड, यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रमुख मान्यवरांचा सत्कार तेजस्विनी महिला उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आला.
प्रारंभी कामगारांच्या मुलांना मान्यवरांच्या हस्ते फराळ देण्यात आले त्यानंतर मुलांसमवेत दिवाळीचे फटाके उडवून त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यात आला.
यावेळी बोलताना सोलापूर शहर मध्य महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांनी दिलीप कोल्हे आणि मंगला कोल्हे यांच्या कामाचे कौतुक केले. चाळीचा प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या कडे नेऊन मार्गी लावू अशी ग्वाही सर्वांसमवेत दिली.
कार्यक्रमाचे आयोजक दिलीप कोल्हे यांनी कामगारांच्या मुला समवेत साजरी करण्यात येणारी दिवाळी याविषयी माहिती दिली यासह चाळीच्या अडचणी मांडून त्या दूर व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रनजीत कोल्हे, रणवीर कोल्हे, मंगेश डोंगरे, आरिफ निगेबान, जावेद शेख, कादर जमादार, सतीश मस्के, कल्लाप्पा कामाने, सलीम पठाण, यांच्यासह दिलीप कोल्हे मित्र परिवाराच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.