अफसाना बेग यांचा स्तुत्य उपक्रम, काॅ.फातीमा बेग महिला संस्थेमार्फत शाळेस शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित 71 पुस्तकाचे संच भेट
बत्तुल व सिध्दाराम म्हेत्रे प्रशाला कुंभारी सोलापूर येथे 395 वी शिवजयंती मोठ्या उत्साहात जल्लोषात साजरी

सोलापूर : प्रतिनिधी
19 फेब्रु 2025 रोजी बत्तुल व सिध्दाराम म्हेत्रे प्रशाला कुंभारी दोन्ही प्रशालेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून गोदुताई परुळेकर नगरचे चेअरमन काँ.फातिमा बेग यांच्या हस्ते पुष्पहार घालून शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर छञपती शिवाजी महाराज यांच्या मुर्तीची पुजन काँ.अफसाना बेग तसेच शाळेतील मुख्याध्यापिका सौ.चैताली जुगदार व सौ.निलीमा भांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर काॅ.फातीमा बेग महिला व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेमार्फत शाळेस शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील आधारित 71 पुस्तकाचे भेट संच दिल्या. तसेच शिवाजी महाराज यांची फोटो भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
तसेच शाळेतील 48 शिक्षक व शिक्षकांना लाल, नारंगी, केसरी कलरचे फेटे बांधून गौरविण्यात आले. संस्थेमार्फत सर्वाचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थी भाषण व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यांवेळी संस्थेच्या अध्यक्ष /प्रमुख वक्ते म्हणून लाभलेले काॅ.अफसाना बेग यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शिवाजी महाराज हे केवळ व्यक्तिमत्त्व नसून एक विचारधारा व जगण्याचे तत्वज्ञान आहे. त्यांचा हा जयघोष टिकवण्याची जबाबदारी ही आजच्याच तरुण-पिढीची आहे. हे मात्र निश्चित आहे. असे विचार यांनी यांवेळी स्पष्ट केलं.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित मान्यवर चेअरमन गोदुताई परुळेकर नगरचे काॅ.फातीमा बेग हे प्रमुख पाहुणे म्हणून तसेच काॅ.फातीमा बेग महिला व बहुउद्देशीय बिडी घरकुल सो.संस्थेच्या अध्यक्ष काॅ.अफसाना बेग, सचिव-सौ.शमीम बेग, शाळेतील मुख्याध्यापक सौ.चैताली जुगदार, सौ.निलिमा भांगे, तसेच मा.ताकभाते सर, संस्थेच्या सदस्य-लता कांबळे उपस्थित होते.
कार्यक्रमाची प्रस्तावना सूत्रसंचालन सौ.अंजली शरद पवार यांनी केलं. तर आभारप्रदर्शन जमादार सर यांनी केले. शेवटी जय भवानी जय शिवाजी या गगनभेदी जयघोष जल्लोषात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.