यंदा गड राखत विजयी होणार, श्री सोमेश्वराचे दर्शन घेऊन युवराज राठोड यांचा प्रचाराला सुरुवात

सोलापूर : प्रतिनिधी
दक्षिण परिवर्तन विकास आघाडीच्या वतीने युवराज राठोड यांनी अपक्ष उमेदवारी दक्षिण विधानसभा मतदारसंघातून दाखल केली आणि त्यांनी श्री सोमेश्वराचे दर्शन घेऊन आपल्या प्रचाराची सुरुवात केली यंदाचा गड राखत विजय होणार असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला.
दक्षिण मधील प्रस्थापितांना धक्का देण्यासाठी सर्वसामान्य, गोरगरीब, कष्टकरी, अंध अपंग, यांना न्याय मिळावा यासाठी दक्षिण परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सर्व पक्षांमधील नाराज, अपक्ष, बंडखोर आणि दक्षिणचा विकास व्हावा या विचाराने अनेक जुने, नवीन आणि युवक नेते मंडळी एकत्र आले होते. परंतु अनेक कारणांनी ते विखुरले गेले परंतु काही जणांनी दक्षिण परिवर्तन विकास आघाडीची वज्रमुठ एकी आजही कायम ठेवली आहे. त्या माध्यमातून अपक्ष उमेदवार युवराज राठोड यांना ताकद देत त्यांचा धुमधडाक्यात प्रचार सुरू आहे.
खऱ्या अर्थाने दक्षिण विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा दृष्टिकोन सन्मान समोर ठेवत अपक्ष उमेदवार युवराज राठोड हे तेथील युवक जेष्ठ मंडळी यांच्या मदतीने निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारामध्ये युवक आणि महिलांची मोठी गर्दी दिसून येते.