यंदा जनतेने निवडणूक हातात घेतली आहे, मागील आमदाराने गेली वीस वर्षे काहीच न केल्याने बाळे भागातील तसेच शहर उत्तर मधील नागरिक महेश कोठे यांच्या पाठीशी

सोलापूर : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार हे तुतारी या चिन्हावर निवडणूक लढवत असून, महेश कोठे याना शहर उत्तर मधील सर्वच भागातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे, ठिक ठिकाणी महेश कोठे यांचे औक्षण करून पुष्पहार घालून रांगोळ्या काढून स्वागत करण्यात येत आहे, महेश कोठे यांच्या सर्वच पदयात्रेला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बुधवारी सायंकाळी बाळे भागात महेश कोठे यांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढण्यात आली, ही पदयात्रा बाळे कॉर्नर, पुष्पक हॉटेल, संतोष नगर, अंबिका नगर, क्रांती मित्र मंडळ,
नामदेव शिंपी सोसायटी, बाळे गावठाण, खडक गल्ली, खंडोबा मंदिर, मारुती मंदिर भीमनागर आदी परिसरातून काढण्यात आली, यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचे औक्षण करून आणि पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले
यंदा महेश कोठे याना निवडून आणण्यासाठी जनतेने निवडणूक हातात घेतली आहे, गेल्या वीस वर्षात मागील आमदाराने कोणतेही काम केली नाही त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड राग आहे, त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचे महेश कोठे म्हणाले.
या रॅलीचे संपूर्ण नियोजन नेते बिज्जूअण्णा प्रधाने यांनी केले होते.