“भाऊंचा जल्लोष चर्चा सर्वत्र”, देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा लाडक्या बहिणींसह दिलीप कोल्हे यांनी केला जल्लोष

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विक्रमी विजयानंतर शिवसेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या वतीने महिला असंख्य महिला भगिनी कार्यकर्ते युवक यांच्या समवेत जल्लोष करण्यात आला.
प्रारंभी लक्ष्मी विष्णू चाळ येथील गणरायाचे पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहर तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांच्या हस्ते करण्यात आले त्यानंतर गुलालांची मुक्त उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करत एकच जल्लोष करण्यात आला यावेळी घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी शेतकरी कामगार यांना दवाखान्यासह शासनाच्या विविध योजना राबवून त्यांना सरोपरे मदत केले. यासह लाडक्या बहिणींसाठी केलेली योजना ही खऱ्या अर्थाने महिलांना न्याय देणारे आहे. त्यामुळे महाराष्ट्रात महायुतीला सर्वांनी ताकद देत बहुसंख्येने निवडून आणले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनामध्ये घर केले आहे त्यामुळे ते सर्वांना आपलेसे वाटतात. शहर मध्य मध्ये लढत ही चुरशीची होती त्यामध्ये आम्ही निकराने लढलो आणि महायुतीचा उमेदवार देवेंद्र कोठे यांना बहुसंख्य मताने निवडून आणलो. असे मत शिवसेनेचे शहर समन्वयक तथा माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनी व्यक्त केला.
या जल्लोषावेळी माजी नगरसेविका मंगलाताई कोल्हे, वंदना जाधव, मंगल डोंगरे, उषा नायडू, नरसिमा पठाण, नसीमा शेख, मंगला बनसोडे, आशा कांबळे, सपना माने, रनजीत कोल्हे, रणवीर कोल्हे, मंगेश डोंगरे, सलीम पठाण, राहुल काटे, बाळू सुरवसे, गुलाब शेख, कल्लाप्पा कामाने, मधुकर पाटिल, सुधाकर यादव यांच्यासह चाळीतील लाडक्या बहिणी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.