महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष गाड्यांचे नियोजन व स्लिपर कोचचे डबे वाढवावे : खासदार प्रणिती शिंदे

सोलापूर : प्रतिनिधी
विश्वरत्न परमपुज्य बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 06 डिसेंबर 2024 रोजी महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षी हजारो भिमसैनिक ऊर्जा भुमी, चैत्यभुमी येथे डॉ. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीस वंदन करण्यासाठी जात असतात. भारतीय रेल्वे विभागाच्या वतीने दरवर्षी सोलापूर येथून विशेष गाड्या सोडल्या जातात.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभुमीकडे जाणाऱ्या अनुयायांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे यावर्षी आणखी विशेष अनारक्षित गाडी सायंकाळच्या सत्रात चालविण्याची व्यवस्था करण्यात यावी. 1) 04 डिसेंबर 2024 रोजी व 05 डिसेंबर 2024 रोजी कलबुर्गी सोलापूर मुंबई व 2) 06 डिसेंबर 2024 रोजी व 07 डिसेंबर 2024 रोजी. १) सोलापूर – मुंबई विशेष गाडी २) मुंबई-सोलापूर-कलबुर्गी या रेल्वे गाडया सोडण्यात यावेत. तसेच वयोवृध्द लोक, लहान मुले व महिला यांच्यासाठी स्लिपर कोचचे डबे जोडण्यात यावी. या विशेष गाड्याना सोलापूर जिल्ह्यातील विविध लहान व मोठ्या स्थानकांवर थांबा देण्यात यावा जेणेकरून जिल्ह्यातील सर्व अनुयायांना मुंबई येथे जाण्यास सोईस्कर होईल. याबाबत भिमसैनिकांनी मला स्वयंस्पष्ट निवेदन दिलेले आहे. अशा आशयाचे पत्र खासदार प्रणिती शिंदे यांनी मध्य रेल्वे विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना दिले.