देवेंद्र फडणवीस म्हणजे ठरवलं की कार्यक्रम असतो, एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मी तांडव केल्याशिवाय राहणार नाही : राम सातपुते

सोलापूर : प्रतिनिधी
माळशिरस विधानसभा मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी निसटत्या पराभवा नंतर आपल्या भाजप महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जिवलग मित्रांसमवेत बैठक घेतली. यावेळी बोलताना त्यांनी दिलखुलास बेधडक आणि सडेतोड मनमोकळे करत आपले मत व्यक्त केले.
यावेळी बोलताना राम सातपुते म्हणाले माळशिर तालुक्यात माझा कारखाना, सुतमिल नाही किंवा साधी पिठाची गिरणी ही नाही, मी फक्त कामाच्या जोरावर मताचे दान मागितलं आपल्यासारखे जीवाभावाची माणसं माझ्यासोबत होती. विरोधी उमेदवारांना घराघरात पैसे वाटले बुटासगत मोहिते पाटलाच्या पाया पडले, देवेंद्र फडणवीस म्हणजे ठरवलं की कार्यक्रम असतो अभी तो पार्टी शुरू हुई है, आमचा निसटता पराभव होऊन देखील इथे आनंद आहे जल्लोष आहे तिकडे विजय होऊन सुद्धा निराशाय सुतक पडलाय. याला म्हणतात ताकद एकटा कार्यकर्ता नडला, एक शब्द लक्षात ठेवा माळशिरस मधील जनतेला मी एक शब्द देतो, माळशिरस तालुक्याला मी कधी एकटा पडू देणार नाही. मागच्या पाच वर्षात लई सहन केलं माझा तो स्वभाव नाही मी लढणारा कार्यकर्ता आहे. एका जरी कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर मी तांडव केल्याशिवाय राहणार नाही.
तुमच्या फांद्यांना आवरा माझ्या कार्यकर्त्याला जर कोणी धमकी दिली तर मी घोडा लावत असतो, माझा खरा स्वभाव अजून माहित नाही कार्यकर्त्याच्या केसाला धक्का लागला तर भाजप सरकार काय आहे हे त्यांना दाखवून देऊ. ते म्हणतात एका रात्रीतून निवडून आलं पण भारतीय जनता पार्टीने शंकर कारखान्याला 113 कोटी रुपये दिले दहा मिनिटात विधान परिषदेची आमदारकी दिली. तुम्हाला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस चा पट्ट्या तुम्हाला उत्तर देणार, अदृश्य शक्ती म्हणजे माळशिरस तालुक्यातील जनता होती त्यांनी आपल्यासाठी भरपूर केलं. कार्यकर्त्यांशी संवाद साधणारा हा व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या मोठ्या प्रमाणात वायरल होत.