सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
पाचव्यांदा विक्रमी मताने निवडून आल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी केला सत्कार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर तसेच महायुतीच्या ऐतिहासिक विजयानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई येथील सागर निवासस्थानी भेट दिली.
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून विजय मिळविल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी आमदार विजय देशमुख यांचा सत्कार करत शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, उत्तर विधानसभा संयोजक संजय कोळी, प्रमोद मोरे, प्रसाद कुलकर्णी, किरण पवार आदी उपस्थित होते.