पॅसेंजरला रिक्षात बसवुन जबरदस्तीने पैसे काढणारी टोळी अटक, फौजदार चावडी पोलीस ठाणे DB पथकाची कामगिरी

सोलापूर : प्रतिनिधी
फौजदार चावडी पोलीस ठाणे गु.र.नं. ३६२/२०२४ भा.दं.वि.सं. कलम ३९२, ३२३, ५०६, ३४ प्रमाणे दाखल गुन्हयात सोलापूर पुणे हायवे वरील बाळे येथील ब्रिज खाली रिक्षा स्टॉप येथुन पॅसेंजर फिर्यादी यास रिक्षात बसवुन त्याचे बाजुस रिक्षा चालकांचे दोन साथीदार यांना बसवुन सदरची रिक्षा तुळजापुर रोड डी मार्ट ते कोडी येथील भारत पेट्रोल पंप येथे घेवुन जावुन पॅसेंजर फिर्यादीस लोखंडी रॉड फायटरचा धाक दाखवुन जिवे ठार मारण्याची धमकी देवुन रोख व क्युआर कोडव्दारे ऑनलाईन फोन पे व्दारे असे मिळुन १,०७,०००/- रुपये ट्रान्सफर करुन घेतले म्हणुन वगैरे मजकुर प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हयाचा सपोनि/शंकर धायगुडे हे ०६ जून २०२४ रोजी तपास करत असताना नमुद गुन्हया मधील पॅसेंजर यांना दमदाटी व धक्काबुक्की करुन जबरदस्तीने पैसे काढुन घेणारे इसम जुना पुना नाका, येथील ब्रीजखाली नाल्याजवळ काळया पिवळ्या रंगाची रिक्षा MH13CT8170 लावुन जुना पुना नाका येथील नाल्याखालील रोडवर थांबले आहेत. अशी खात्रीशीर बातमी मिळाली. सदर बातमीची शहानिशा व खात्री करण्याकरिता सपोनि/धायगुडे गुन्हे प्रकटीकरण पथकातील अंमलदार दोन पंचासह पंचनामा करण्याकरिता लागणारे साहित्य घेवुन खाजगी वाहनाने कारवाईकामी जुना पुना नाका येथील नाल्याजवळ गेले असता सदर ठिकाणी तीन इसम रिक्षात बसुन पोलीसांना पाहुन पळुन जावु लागले त्यास पोलीसांनी शिताफीने ताब्यात घेतले. व त्यांना पंचासमक्ष त्याचे नाव व पत्ता विचारले असता त्यांनी आपले नाव १) शिवम चंद्रकांत अलकुंटे वय २५ वर्षे, धंदा-मजुरी, रा. बुधवार पेठ, वडार गल्ली सोलापूर २) अभिजीत रमेश जाधव वय ३१ वर्षे, धंदा-रिक्षा चालक, रा.४०६ उत्तर कसबा, कैकाडी गल्ली सोलापूर ३) अभिषेक नागनाथ अडगळे वय २१ वर्षे, धंदा-खाजगी नोकरी, रा.१०२/सी भवानी पेठ, सोलापूर, असे सांगितले. त्यानंतर रिक्षाचे मालकी हक्क व कागदपत्रांबाबत विचारणा केली असता, काळ्या पिवळ्या रंगाची रिक्षा ही अभिजीत जाधव याचे मालकीची असल्याचे सांगितले. त्यावेळी वरील नमुद इसमांची पंचासमक्ष अंगझडती व रिक्षाची झडती घेतली असता, नमुद आरोपीकडे मोबाईल, रोख रक्कम, स्टीलचा रॉड, लोखंडी फायटर असे एकुण ३,९८,६५०/- रुपये किमंतीचा मुद्येमाल मिळुन आला. त्यावेळी त्यांचेकडे सदर मुद्येमाल बाबत चौकशी केली असता त्यांचा सदर गुन्हयात सहभाग निष्पन्न झाल्याने त्यांना ०६ जून २०२४ रोजी १९.३० वा.अटक केली आहे.
सदरची कामगिरी ही पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपआयुक्त (परिमंडळ) विजय कबाडे, सहा. पोलीस आयुक्त विभाग-१, अशोक तोरडमल, वपोनि दिलीप शिंदे, दुपोनि विकास देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर धायगुडे, पोह/अजय पाडवी, पोह/प्रविण चुंगे, पोना/आयाज बागलकोटे, पोना/शिवानंद भिमदे, पोकॉ कृष्णा बडुरे, पोकों/ विनोद व्हटकर, पोकों/विनोदकुमार पुजारी, पोकॉ/सचिनकुमार लवटे, पोकों/नितीन मोरे, पोकों/अजय चव्हाण, पोकों/अमोल खरटमल, पोकों/पंकज घाडगे, पोकों/सुधाकर माने, पोकों/अतिश पाटील, पोकों/अर्जुन गायकवाड, पोकों/शशिंकात दराडे, पोकों/तोसीफ शेख, यांनी केलेली आहे.