यंदाही आस्थाची दिवाळी वंचितांसोबत, भिक्षुकांना अभ्यंग स्नान अनाथ मुलांना कपडे तसेच निराधार महिलेंना साडी वाटप केली

सोलापूर : प्रतिनिधी
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळीनिमित्त गोरगरीब गरजू, एचआयव्हीग्रस्त, स्मशानामध्ये काम करणारे विविध घटक अशा लोकांना यंदाची दिवाळी गोड व्हाव म्हणून आस्था फाउंडेशन आस्था रोटी बँक हे नेहमी अशा लोकांना नेहमीच मदत करते.
यंदाची दिवाळी एकूण १००० लोकांना नवीन साडी कपडे व दिवाळीचे फराळ वाटप करण्यात आले आहे. यावेळी प्रमुख पाहुण्याचे भाषण झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह राजपूत यांनी आपल्या भाषणामध्ये आस्था रोटी बँकेचे सामाजिक काम खूप महत्त्वाचे आहे दिवाळीनिमित्त अशा गोरगरीब गरजू लोकांना मदत करते म्हणून या संस्थेचे आदर्श घ्यावे असे त्यांनी म्हटले आहे
प्रथमता भिक्षुक लोकांना अभ्यग स्नान घालून नवीन कपडे व ओवाळणी करण्यात आली आहे. नंतर मान्यवर सर्व व्यासपीठावर विराजमान झाले त्यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते फराळ साड्या व अनाथ मुलांना कपडे वाटप करण्यात आले आहे.
पहाटे उठून उटण सुगंधी साबण तेलाने घराघरात अभ्यंग स्नान होतात गोडधोड पदार्थ बनवले जातात खल्ले जातात परंतु समाजात आजही एक वर्ग असा आहे ज्यांना एखादी नवी साडी किंवा घरातील लहानाग्यांना नवे कपडे घेणे असो वा अबाल वृध्दांना फराळ हे सर्वच करणे अश्यक्य आहे हीच गरज ओळखून आस्था फाऊंडेशन संचलित आस्था रोटी बँकेतर्फे दररोजच अन्नदान होत असते सोलापुरातील विविध झोपडपट्टींमध्ये जाऊन समाजमध्यमांद्वारे दिलेले खाण्यास योग्य असलेले अन्न वेळप्रसंगी स्वखर्चातून 365 दिवस अन्नदानाच्या या यज्ञात यंदा सहभाग दिला.
लियो क्लब आॕफ सोलापुर तसेच शासन सेवा मंडल आणि सौ.मनिषाताई सुरवसे आणि डाॕ मिना गायकवाड यांच्यावतीने सोलापुरातील गरीब व गरजू वंचित महिलांकरिता साडी वाटप अनाथ व गरजू लहान मुलांना कपडे वाटप तर समाजा कडून उपेक्षित असलेला एच आय व्ही पिडीत रुग्णांना व रस्त्यावरिल भिक्षुकांना अभ्यंग स्नान नवीन कपडे टाॕवेल टोपीचा मानाचा आहेर देण्यात आला.
कार्यक्रमाचे मुख्य आर्कषण ठरले भिक्षुकांना अभ्यंग स्नान व नवीन कपडे व फराळ वाटप ज्यांना आपण नेहमी गलिच्छ कपड्यात मळकटलेल्या वेशात पाहिलेले ते आज शोभून दिसत होते. खरच हयांना पाहिल की वंचितांसोबत केलेली ही दिवाळी सार्थ होत असल्याचे दिसते.उपस्थित गरीब गरजू महिलांना साडी व फराळ पाकिट देण्यात आल तर लहानाग्यांना नवे कपडे व फराळ पाकिट मान्यवरांकडून वितरीत करण्यात आल.
हया कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती सरकारी वकील प्रदिपसिंग रजपूत, राजू हौशेट्टी सौ.मनिषाताई सुरवसे, विजयाताई सुरवसे, सचिवा सुरवसे शिक्षण संस्था सोलापूर श्वेता सुरवसे, समाजसेवक पण पेश्याने डाॕक्टर असलेल्या डाॕ.सोनाली घोंगडे, डाॕ.मिनाताई गायकवाड, वीरशेव चे अध्यक्ष राजशेखर विजापुरे व तसेच सुनील शरणार्थी, अरुण धुमाळ. लियो क्लबच्या सौरभ मालू शासन सेवा मंडळाची 25 तरुणाची टिम कटारिया, दर्शन बाफना हे होते.
तर आस्थाच्या वतीने आस्था टिमकडून सहकार्य मिळाले ते संस्थापक अध्यक्ष विजय छंचुरे, संगिता छंचुरे, महिला अध्यक्षा निलिमा हिरेमठ, कांचना हिरेमठ , छाया गंगणे, ज्योत्सना सोलापुरकर, निता आक्रुडे, मंगल पांढरे, माधुरी बिराजदार, बेले मॅडम, पुष्कर पुकाळे, अविनाश माचरला, अनिता तालीकोटी, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया गंगणे तर प्रस्तावना निलिमा हिरेमठ व आभार प्रदर्शन पुष्कर पुकाळे यांनी केले.