सोलापूरधार्मिकमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
सोलापूर विमानतळाला श्री स्वामी समर्थांचे नाव द्या, कुलकर्णी यांची उपमुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर विमानतळाला अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव महेश कुलकर्णी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
कुलकर्णी यांनी उपमुख्यमंत्री पवार यांची मुंबईत भेट घेऊन याबाबतच्या मागणीचे निवेदन त्यांना दिले असून स्वामी समर्थ हे राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे सोलापूर विमानतळाला त्याचे नाव देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली आहे. यावेळी शरद येच्चे यांच्या सह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.