अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, भिमशक्ती सामाजिक संघटनेची मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
देशाच्या संविधानाच्या ७५ व्या वर्षानिमित्त लोकसभा व राज्यसभेमध्ये संविधानाच्या संदर्भात चर्चा चालू असतांना १८ डिसेंबर २०२४ रोजी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल असंविधानिक भाषा वापरुन त्यांना आपमानित करण्याचा प्रयत्न केला त्यांच्या या वक्तव्याचा भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने निषेध करण्यात आला.
जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट येथे भिमशक्ती सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा राज्यसभा खासदार चंद्रकांतजी हंडोरे यांच्या आदेशानुसार भिमशक्तीचे सर्व प्रमुख पदाधिकारी एकत्र येवून अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करुन निर्देशने केली.
अमित शहा यांनी जे वक्तव्य केले त्या वक्तव्यामुळे संपूर्ण संविधान व संसदेचे दोन्ही सभागृह व देशभरातील संविधानांना मानणाऱ्या सर्व जनतेचा अपमान केला आहे. या वक्तव्यामुळे अमित शहा यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी भिमशक्ती सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली. यावेळी राज्यसरकार व केंद्र सरकाराच्या विरोधात मोदी, फडणवीस सरकारच्या विरोधात मोठ्या प्रमाणावर निषेधाच्या घोषणा देण्यात आले.
या आंदोलनाचे नेतृत्व प्रदेश सरचिटणीस सुबोध वाघमोडे, पश्चिम महाराष्ट्राचे सरचिटणीस राजाभाऊ कदम, शहर अध्यक्ष उमेश सुरते यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष प्रमिला तुपलोंढे, कार्याध्यक्ष अॅड. कमरुनिसा बागवान, जिल्हा कार्याध्यक्ष संध्याताई काळे, शोभा बोंबे, मेजर सुखदेव साबळे, विक्रम वाघमारे, नागेश गायकवाड, समीर मुल्ला, मायाभाई कांबळे, भारत क्षिरसागर, मनोज लोंढे, रत्नमाला परदेशी, सुनंदा बडुरे, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष महिला आघाडी नसरीन शेख, सौ. विजयालक्ष्मी झाकणे, सौ. राजश्री साबळे, सौ. मुमताज शेख, सौ. छाया हिरवटे, सौ. मिना गायकवाड, के.एम. कांबळे, गणेश चंदनशिवे, राजा नागटिळक, किर्ती शिवशरण, युवक शहराध्यक्ष मयुर तळभंडारे, अमोल रणशंगारे, सोनु सुरते, बाबा कोने, विशाल कांबळे, प्रथमेश कदम, नितीन साळवे, छिया कांबळे, गणेश हंसुरे, श्रीकांत गायकवाड, सोमनाथ शिंदे,
अभिषेक पाटुळे, अमित लोंढे, नितीन पवार, विकी लोंढे, संजय जाधव, रफिक शेख, सलीम मुल्ला, हर्दिप बनसोडे, सचिन साबळे, सुरज गायकवाड, पप्पु रणदिवे, विनोद रणदिवे, विजय रणदिवे, संजय रजपुत, सौदाग मोरे, सुरेश क्षिरसागर, इब्राहीम शेख, रफिक शेख इत्यादी पदाधिकारी यावेळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.. या निर्देशनाच्या सुरुवातीस परभणीचे जेष्ठ पॅथर व आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते विजय बाबा वाकोडे यांना भावपूर्ण श्रध्दाजंली वाहण्यात आले.