समविचारी संघटनेचेवतीने बीड व परभणी येथील घटनांचा तीव्र निषेध

सोलापूर : प्रतिनिधी
बीजेपी सरकारच्या राजवटीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालं असून सोलापुरातील सर्व धर्मीय समविचारी संघटना एकत्र येऊन बीड व परभणी येथील घटनेच्या तीव्र शब्दात निषेध करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीची निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सचिव संयुक्त राष्ट्र संघ यांचे कार्यालय न्यूयॉर्क यांना देण्यात आले.
या निवेदनात मागील दहा वर्षापासून भारतामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संचलित सरकार भारतामध्ये व भारतातील विविध राज्यांमध्ये सत्तास्थानी विराजमान असून भारतातील अन्य त्यामध्ये मुस्लिम, शिख, बौद्ध, जैन, पारशी, आधी अल्पसंख्यांकावर मोबलिंचींग होत आहे. सार्वजनिक ठिकाणी पाण्याच्या टाकीतील पाणी प्याले म्हणून अल्पसंख्यांकांच्या धार्मिक स्थळाच्या खाली बहुसंख्यांकांची मंदिर असल्याचे कारण करून अल्पसंख्यांक यांना त्यांच्या अधिकारावर व स्वातंत्र्यावर नैसर्गिक न्याय हक्कावर हल्ल्याचे प्रमाण वाढले आहे नुकतेच महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या महाराष्ट्र सरकारने शपथविधी होऊन आठवडा देखील झालेला नसताना परभणी मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या वतीने कोंबिंग ऑपरेशन मध्ये पोलिसांकडून जबर मारहाण झाल्यामुळे कायद्याची पदवी घेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी या युवकाचा मृत्यू झाला त्याची एसआयटी चौकशी करून संबंधित दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी.
महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध अल्पसंख्यांक सर्वांच्या विरोधात छोट्या जाती व दलित समाजामध्ये महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये झालेल्या जातीयवादी प्रचाराचा दुष्परिणाम होऊन बीडमध्ये संतोष देशमुख या सरपंच असलेल्या युवकाच्या जबर मारहाणीत मृत्यू झाला त्याचीही एसआयटी चौकशी करण्यात येऊन संबंधितावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.
भारतभर मुस्लिम समाजाचे मोबिचिंग नेहमीचेच झाले आहे भारतासह जगभर त्यासह बांगलादेश येथे हिंदू शिक जैन बौद्ध पार्षी व गाजपट्टी येथे मुस्लिम यांचे जीवन व वित्त संकटात सापडले असल्याने आपल्या स्तरावर कृती आराखडा तयार करून भारतातील विविध जाती खास करून महाराष्ट्रातील मराठा महार मुस्लिम यांना न्याय मिळण्यासाठी ठोस पावले संयुक्त राष्ट्र संघाने उचलावीत अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
यावेळी उत्तम नवगिरे, शाम कदम, राहुल सावंत, शेखर बंगाळे, मिलिंद प्रक्षाळे, रशीद सरदार, एजाज कनुल, प्रवीण चाफाणी, सोहेल शेख, आधी सह विविध पदाधिकारी उपस्थित होते.