सुनिल रसाळे आक्रमक, प्रकाश वाले यांची काँग्रेस मधून हकालपट्टी करा, सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे यांच्याकडे केली मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
युवा नेते प्रवीण प्रकाश वाले यांच्या वाढदिवसा निमित्त मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरला माजी पालकमंत्री तथा शहर उत्तरचे विद्यमान आमदार विजयकुमार देशमुख यांनी हजेरी लावली आणि त्यांनी प्रवीण वाले यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार केला. यावेळी बोलताना त्यांनी प्रवीण वाले यांनी विधानसभेत चांगले काम केले असून आम्हाला मदत केल्याचे पुष्टी दिली. भाजपामध्ये प्रवीण वाले यांना नक्कीच न्याय मिळेल असेही ते म्हणाले. याचबरोबर काँग्रेस कमिटीचे माजी शहराध्यक्ष प्रकाश वाले यांनीही भाजपसोबत यावे असे देशमुख म्हणाले.
२०१७ मध्ये वाले यांची काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदावर निवड झाली. पुढे ते साडेसहा वर्ष अध्यक्ष पदावर राहिले. १९९७ मध्ये काँग्रेसकडून ते नगरसेवक झाले. प्रकाश वाले काँग्रेसचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख होती. आज ते भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू आहे.
यावर सोलापूर शहर काँग्रेस कमिटीचे वरिष्ठ कार्याध्यक्ष सुनील रसाळे यांनी टीका करत माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे, शहराचे अध्यक्ष चेतन नरोटे यांना माहिती देत प्रकाश वाले यांची पक्षातून हकलपट्टी करावी अशी मागणी केली. यावेळी त्यांनी आक्रमक पवित्र घेत आपली भूमिका मांडली..