रखडलेल्या आसरा पूल रुंदीकरण निषेधार्थ खासदार आमदारांच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे बोंबाबोब आंदोलन

सोलापूर : प्रतिनिधी
जुळे सोलापूरला जोडणारा आसरा रेल्वे पूल रुंदीकरण गेल्या अनेक वर्षांपासून रखडल्याने महानगरपालिका प्रशासन, महारेल प्रशासन, आमदार, खासदार यांच्या निषेधार्थ आसरा पुलावर संभाजी ब्रिगेडच्या वतीनं बोंबाबोंब आंदोलन करून निषेध करण्यात आला.
सोलापुरातील खासदार, आमदारांच्या दुर्लक्षामुळे आसरा पूल रुंदीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून देखील दोन वर्षापासून हा प्रश्न प्रलंबित आहे आणखी कुण्या नागरिकाच्या बळी गेल्यावर हे काम सुरू होणार आहे का? त्यामुळे प्रशासनाला व लोकप्रतिनिधींना जाग आणण्यासाठी संभाजी ब्रिगेड व नागरिकांच्या वतीने बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शाम कदम, जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले, शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, संपर्कप्रमुख छत्रगुण माने, शहर उपाध्यक्ष माधुरी चव्हाण, शहर उपाध्यक्ष मनीषा कोळी, राजनंदनी धुमाळ, दक्षिण तालुका अध्यक्ष शेखर चौगुले, शहर उपप्रमुख सिताराम बाबर, शहर उपाध्यक्ष फिरोज सय्यद, विराज कुरेशी, शब्बीर शेख, तोशिफ नदाफ, सय्यद पटेल, रमेश जमादार, सुरेश पाटील, आलोक काळे, प्रवीण शिरणार, विठ्ठल भोसले, सचिन देशमुख, संतोष जगती, धर्मराज जगती, रमेश भंडारे, मल्लिकार्जुन शेवगार, गौरीशंकर वरपे, विश्वनाथ अमाने, बाळासाहेब शिंदे, शिवराज वारे, काझी हैदर, महेश गुब्याद आदि उपस्थित होते.