“रक्तदान महायज्ञ”च्या माध्यमातून जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान सोलापूर सेवा समितीच्या वतीने करण्यात येणार 5 हजार रक्तदान

सोलापूर : प्रतिनिधी
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्या वतीने देशभरात १ लाख रक्तदान करण्याचा संकल्प या माध्यमातुन स्व-स्वरुप संपद्राय सोलापूर जिल्हा सेवा समिती करणार ५ हजार रक्तदान करण्याचा मानस आहे.
अनंत श्री विभुषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री. स्वामी नरेंद्राचार्य महाराज नाणीज धाम, रत्नागिरी, प्रणित स्व-स्वरुप संपद्राय सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्यावतीने सोलापूर जिल्ह्यात ०४ जानेवारी ते १९ जानेवारी २०२५ रोजी पर्यंत “रक्तदान महायज्ञ” हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
सोलापूर शहर, जिल्हा, तालुका, गांव अशा विविध ठिकाणी सोलापूर जिल्ह्यात ३५ रक्तदान शिबीरे आयोजित करण्यात आलेली आहे. या शिबीर माध्यमातुन सोलापूर शहर जिल्ह्यातून ५ हजार रक्तदान करण्याचा मानस आहे.
तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील भक्त, शिष्य, रक्तदान दाते, नागरीक यांनी या रक्तदान शिबीरात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा असे आवाहन स्व-स्वरुप संपद्राय सोलापूर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान, बहुमुल्य कार्य समाज उपयोगी लक्षात घेवून जगद्गुरुनी या संकल्पनातुन “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” असा संदेश दिलेला आहे. तसेच विशेष कार्य असे की, जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान यांच्यावतीने ०४ जानेवारी २०२५ ते १९ जानेवारी २०२५ पर्यंत संपूर्ण भारत देशात “रक्तदान महायज्ञ” या संकल्पनातुन १ लाख रक्तदान करण्याचा संकल्प आहे.
ज्यांना रक्तदान करायचं आहे त्यांनी खालील नंबर वर संपर्क साधून रक्तदान करावे
संपर्क :- मो.नं. ९८९०५८४५४५, ७०५७९९८१८१, ९३७०९१७५०४, ९८८१५९३७६७