सोलापूरमहाराष्ट्रसामाजिक

रोटरी सोलापूर परिवारातर्फे गरजू महिलांना मोफत आटा चक्कीचे वाटप

सोलापूर : प्रतिनिधी

“रोटरी की आशा” या उपक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या पटीने महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी २ एचपी क्षमतेची ताशी २५ किलो मान्य मसाला दबता येईल अशी कमर्शियल आटा चक्की देण्यात आली. ३१३२ या रोटरी प्रांताच्या प्रांतपाल रोटरियन स्वाती हेरकल यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.

सोलापूर शहरासाठी त्यांनी डिस्ट्रिक ग्रेट मधून राब्बल २७ आटा चक्की मंजूर केल्या, सोलापूर शहरातील सर्व रोटरी क्लब ने गरजू महिलांची काळजीपूर्वक निवड करून या योजनेचा लाभ त्यांना मिळवून दिला आहे. या महिला स्वतःच्या घरात धान्य व मसाले दळून देण्याचे काम करतील, त्याच्यासाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी ही योजना बरदायीनी वरणार आहे. मिल्टन कंपनीच्या या स्वयंचलित मशीन आहेत. या मशीन मध्ये फक्त धान्यच नाही तर मसाले पण दळता येणार आहेत. विविध सात जाळ्यांचा संच देखील यासोबत देण्यात आला.

संपूर्ण स्टेनलेस स्टीलच्या या मशीनमध्ये जर्मन तंत्रज्ञान वापरले गेले आहे. अगदी घरगुती सिंगल फेजवर सुद्धा या मशीन चालतात. यामध्ये सर्व प्रकारची धान्य, लाल मिरची, हळद व विविध मसाले देखील दळता येतील. या २७ लाभार्थ्यांना समारंभपूर्वक या अटाचक्कीचे वितरण १४ जून २०२४ रोजी सोलापूर रोटरी परिचारा मार्फत करण्यात आले.

इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्याने दमाणी ब्लड बँकेत या मशीनचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझी रोटरी प्रांतपाल डॉक्टर राजीव प्रधान होते. सोलापूर रोटरी परिवाराच्या अध्यक्षा रोटेरियन ज्योती चिडगुपकर यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रांतपाल पदी नियुक्त झालेले व रोटरी सोलापुर परियाराचे मार्गदर्शक रोटेरियन जयेश भाई पटेल यानी प्रास्ताविक केले. उपक्रमाथी माहिती व सुत्रसंचालन रोटरी क्लब ऑफ सोलापूर हर्मनीचे अध्यक्ष रोटेरियन अविनाश मठपती यांनी केले. रोटरी सोलापूर परिणराचे सचिव व रोटरी जुळे सोलापूरचे अध्यक्ष रोटेरियन माऊली झांबरे यांनी आभार मानले.

याप्रसंगी सहाय्यक प्रांतपाल रोटेरियन राजन वोरा व रोटेरियन अतुल चव्हाण उपस्थित होते. याशिवाय विविध क्लबचे प्रेसिडेंट आनंद लोणावत, राकेश उदगीरी, महेश साळुंखे, जान्हवी माखीजा, श्रीकांत अंजूटगी, स्वाती मनसावाले, व्यंकटेश सोमाणी, चार्वाक बुरगुल व इतर मान्यवर उपस्थित होते. याशिवाय वा योजनेतील लाभार्थी महिला देखील उपस्थित होत्या. या स्तुत्य उपक्रमामुळे रोटरी सोलापूर परिवाराचे समाजातील सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!