सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
विशाल भांगे आणि लिंबराज जाधव यांचा प्रकाश भाऊ जाधव मित्र परिवाराच्या वतीने सन्मान

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य माजी मुख्याध्यापक संघाचे प्रदेश उपाध्यक्ष पदी तथा वाढदिवसानिमित्त लिंबराज जाधव आणि पत्रकार दिन व ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ जाहीर झाल्या निमित्त युवा पत्रकार विशाल भांगे यांचा सन्मान करण्यात आला.
हा सन्मान सकल मराठा समाजाचे समन्वयक राजन जाधव, मराठा क्रांती मोर्चा समन्वयक हरिभाऊ चौगुले, वैरागचे युवा नेते निरंजन भुमकर यांच्या हस्ते मानाची शाल, भव्य हार, पुष्गुच्छ देऊन कऱण्यात आला.
यावेळी नेताजी जगताप, रमेश जाधव, M.M. इटकळे, प्रसाद खोबरे, राजू पवार, प्रकाश झाडबुके, अमोल कळंब, आणि प्रकाश भाऊ जाधव मित्रपरिवार मोठया संख्येने उपस्थित होते.