सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
अनिताताई गवळी यांचा उपक्रम, महिलांना सक्षम करण्यासाठी घेतले प्रशिक्षण शिबिर

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना महिला आघाडी सोलापूर शहर महिला उपप्रमुख अनिताताई गवळी यांनी बेरोजगार व गरीब होतकरू महिलांसाठी रोजगार मेळावा घेतला.
थोबडे वस्ती येथील समाज मंदिर येथे महिलांना इलेक्ट्रॉनिक बल्बच्या माळा बनविण्याचे शिबिर घेण्यात आले. याप्रसंगी शिवसेना प्रवक्त्या तथा आमदार डॉ. मनिषा ताई कायंदे यांची सदिच्छा भेट. या बेरोजगार महिलांना इलेक्ट्रॉनिक बल्ब तयार करणे, फॅशन डिझायन, शिलाईकाम यां सारख्या उद्योगाचे प्रशिक्षण देण्यात आले.
या प्रशिक्षण मुळे महिला स्वावलंबी बनतील अशी भावना आमदार मनिषा कायंदे यांनी व्यक्त करुन महिलांचे कौतुक केले.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, राजकुमार शिंदे, जयश्रीताई पवार, सुनंदा ताई साळुंके, शशिकला कस्पटे, संगिता खांबसकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. या प्रशिक्षणाचा परिसरातील बहुसंख्य महिलांनी लाभ घेतला.