कष्ट, जिद्द, परिश्रम ही यशाची त्रिसूत्री आहे : प्रदीप सबनीस

सोलापूर : प्रतिनिधी
विद्यार्थी दशेतचांगले संस्कार झाले तर ते आयुष्यभर पुरतात जीवनात. यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट, जिद्द, परिश्रम या त्रिसूत्री चा अवलंब करण्यास विद्यार्थ्यांच्या मनात रुजवावे लागेल तरच यशाची प्राप्ती होणार आहे. असे प्रतिपादन सेवाभारती पश्चिम महाराष्ट्राचे प्रांत सचिव प्रदीप सबनीस यांनी केले.
सेवाभारती सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित फिरती विज्ञान प्रयोग शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी व्यक्तिमत्त्व शिबिराचा समारोप झाला. त्याप्रसंगी सबनीस बोलत होते.
यावेळी प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिरुद्ध पवार, डॉ. अमोल निकम, जिल्हा सचिव बाबूलाल वर्मा, प्रांताचे सामाजिक आयाम प्रमुख सदानंद कुलकर्णी, उपाध्यक्ष वर्षा भावार्थी, शिबिराधिकारी शैलजा मुरूमकर, प्रकल्प प्रमुख धोंडू केंगले, प्रकल्प शिक्षक महादेव सोनगी उपस्थित होते.
याप्रसंगी अनिरुद्ध पवार म्हणाले मिळालेले . ‘ज्ञान वाटल्याने ते वाढते. निवासी शिबिरातून मिळालेल्या संस्काराची जपणूक करून आदर्श नागरिक होण्याचा विद्यार्थ्यांनी प्रयत्न करावा. माणुसकी जपली तरच आपले भवितव्य उज्वल असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित विद्यार्थ्यांना पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन सेवाभारती सोलापूरचे शिक्षण आयाम प्रमुख मोरेश्वर काटवे यांनी केले तर प्रास्ताविक बाबुलाल वर्मा यांनी केले. आभार सहप्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर लवटे यांनी मानले. हे निवासी शिबिर यशस्वी करण्यासाठी महिला प्रमुख मेघना झांबरे, प्रेमा वेर्णेकर, बजरंग कुलकर्णी किरण कोल्हापुरे, मार्तंड चौरे, महादेव सोनगी यांनी विशेष प्रयत्न केले.