मोहसिन मेंदर्गीकर यांनी भाजप वर केली सरकून टीका, MIM कडून उत्तरची निवडणूक लढणार

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ हा भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो या मतदार संघात सलग चार टर्म विजयकुमार देशमुख हे आमदार म्हणून निवडून येत आहेत. परंतु त्यांना यंदाच्या निवडणुकीत उत्तर मधील भाजपच्या पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी विरोध दर्शविला होता. तरी देखील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी विजयकुमार देशमुख यांच्यावर विश्वास दाखवत त्यांनाच पुन्हा एकदा उमेदवारी दिली. भाजपने किंवा आमदार विजयकुमार देशमुख यांनी शहर उत्तर मध्ये कोणताही विकास केला नाही, उलट भाजपाचे छोटे छोटे गट करून मुस्लिम समाजाला दाबण्याचा प्रयत्न केला. असा घणाघाती आरोप MIM चे शहर उत्तरचे उमेदवार मोहसिन मेंदर्गीकर यांनी केला.
पुढे बोलताना मोहसीन मेंदर्गीकर म्हणाले, एकीकडे भाजप हा मुस्लिम विरोधी पक्ष असून दुसरीकडे माजी महापौर महेश कोठे हे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून उत्तर मध्ये निवडणूक लढवणार आहेत. त्यांचे पुतणे भाजपचे नेते देवेंद्र कोठे यांनी मुस्लिमांवर खालच्या पातळीला जाऊन केलेली टीका ही निदनीय असून निषेधार्थ आहे. या सर्वांना उत्तर म्हणून शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून AIMIM पक्षाच्या वतीने उमेदवारी भरणार असल्याची माहिती त्यांनी दिली.