क्राईममहाराष्ट्रसामाजिकसोलापूर

सुशिल कराड विरूद्धच्या खटल्यात कोर्टाने मागविला पोलिसांचा अहवाल

सोलापूर : प्रतिनिधी

वाल्मिक कराड यांचा मुलगा सुशिल कराड यांचे नावे असलेली फर्म सान्वी ट्रेडर्स व त्यांचे पत्नीचे नावे असलेली फर्म अन्वी इंटरप्राइझेस या फर्ममध्ये फिर्यादी महिलेचा पती मॅनेजर पदावर कामास होता. त्याने सन २०२०-२०२१ २०२१-२०२२ २०२२-२०२३ या आर्थीक वर्षामध्ये व्यापा-याकडील होणारी वसुली स्वतःच्या व यातील फिर्यादी पत्नीचे नावे वळती करून घेवून रक्कम रु. १ कोटी ८लाख रूपयांचा अपहार केल्याचा सुशिल कराड यांनी दि. १९ जुलै २०२४ रोजी परळी शहर पोलिस स्टेशन येथे दाखल केली आहे. तेंव्हापासून आजतागायत फिर्यादी व तिचा पती फरार आहेत.

त्यांनी न्यायालयातुन जामिन ही घेतलेला नाही अथवा पोलिसांना सहकार्य करण्यासाठी हजर ही झालेले नाहीत असे असताना प्रस्तुत प्रकरणातील फिर्यादी महिलेने जबरदस्तीने गाडया,सोने व प्लाँट जागा खरेदीखतान्वे लिहून घेतल्याचा तक्रारी अर्ज MIDC पोलिस स्टेशन सोलापूर येथे दाखल केलेला होता. परंतु घडलेल्या घटना या परळी शहरातील असलेने पोलिसांनी तिकडे तक्रार दाखल करण्याचे समजपत्र फिर्यादीस दिलेले होते.

त्यानंतर फिर्यादी महिलेने पोलिस महासंचालकाकडे तक्रार दाखल केली त्याचा तपास परळी,बीड पोलिसांनी केला.त्यामध्ये साक्षीदारांचे जबाब नोंदवून व पुरावा गोळा केल्यानंतर फिर्यादी महिलेचे तकारीत तथ्य नसलेचे व तिने अपहाराच्या गुन्हयास शह देण्यासाठी तक्रार केल्याचे निरीक्षण नोंदवून पोलिसांनी गुन्हा घडला नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे फिर्यादी महिलेने सोलापूर येथील न्यायालयात खाजगी फिर्याद दाखल केलेली आहे. त्यावर दि. १३ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी झाली.

यावेळी युक्तिवाद करताना सुशील कराड तर्फे अँड. संतोष न्हावकर यांनी लेखी म्हणणे दाखल केले असून त्यामध्ये बीड पोलिसांनी केलेल्या तपासाची कागदपत्रे दाखल केली व बीड पोलिसांनी यापूर्वी तपास केल्याचे मे. कोर्टाचे निदर्शनास आणून दिले.

यावेळी न्यायालयाने पोलिसांकडून संपूर्ण अहवालाची गरज व्यक्त करून MIDC पोलीस स्टेशन, सोलापूर यांना तपास करून आठ दिवसांत त्यांचा अहवाल मे.कोर्टात सादर करण्याचा आदेश पारित केला आहे.

यात आरोपीतर्फे अँड.संतोष न्हावकर, अँड.राहुल रुपनर, अँड.शैलेश पोटफोडे हे तर फिर्यादीतर्फे अँड.विनोद सुर्यवंशी हे काम पाहत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!