माता रमाईचा संघर्ष आणि आदर्श सर्व महिलांनी डोळ्या समोर ठेवून समाजाचे हित बघितले पाहिजे : अतिरिक्त आयुक्त रवी पवार
माता रमाई म्हणजे एक आदर्श माता आणि पत्नी कशी असावी हा समाजापुढे खूप मोठा आदर्श : संदिप कारंजे

सोलापूर : प्रतिनिधी
महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियनच्या वतीने त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांची १२७ वी जयंती सोलापूर महानगरपालिकेमध्ये अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली. यावेळी माता रमाई भीमराव आंबेडकर व विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोमपा अतिरिक्त आयुक्त रवी पवार प्रमुख अतिथी मुख्य लेखापाल डॉ.जवळगेकर, सोमपा अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, उपायुक्त पंडित, सहाय्यक आयुक्त मुलाणी, आरोग्य अधिकारी राखी माने, वैद्यकीय शिक्षण व संशोधन वरिष्ठ सहाय्यक लिपीक (मुंबई) धीरज कुमार माने, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख नागनाथ बिराजदार, कामगार कल्याण अधिकारी ओम प्रकाश वाघमारे, मुख्य आरोग्य निरीक्षक नागेश मेंढगुळे, नागटिळक सर, तमशेट्टी सर, लोखंडे, आरोग्य निरीक्षक गायकवाड मॅडम, राजरत्न फडतरे, संघर्ष समितीचे अध्यक्ष सायमन गट्टू, सचिव चांगदेव सोनवणे, सफाई कर्मचारी अध्यक्ष बाली मंडेपु, श्रीनिवास रामगल, यांच्या हस्ते करण्यात आले. व उपस्थित महिला कर्मचारी वर्ग व कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप करून महिला कर्मचाऱ्यांचा फेटा पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी अतिरिक्त आयुक्त रवी पवार हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन ही संघटना नेहमी कर्मचार्यांच्या हितासाठी संघर्ष करत असते सोलापूर महानगरपालिकेमध्ये माता रमाई जयंती एवढ्या मोठ्या उत्साहात साजरी होते हे पाहून मला खूप आनंद झाला. माता रमाईच्या त्यागा बद्दल व जीवनाच्या संघर्षा संदर्भात त्यांनी अनेक उदाहरणे दिली माता रमाईने अनेक प्रकारचे कष्ट केले शेण गवर्या थापून संसार केला आणि बाबासाहेबांच्या अभ्यासामध्ये कसलाही खंड पडू दिला नाही. त्यांची चारही मुलं दगावली तरीही समाजाच्या हितासाठी बाबासाहेबांना कसल्याही प्रकारचे दुःख होऊ दिले नाही. माता रमाईचा संघर्ष व त्यांचा आदर्श आपल्या सर्व महिलांनी डोळ्या समोर ठेवून समाजाचे हित बघितले पाहिजे त्यांचा आदर्श घेऊन आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊन मोठे अधिकारी केले पाहिजे असे ठामपणे सांगितले.
अतिरिक्त आयुक्त संदिप कारंजे यांनी माता रमाई बद्दल बोलत असताना म्हणाले, माता रमाईने कष्टाने आणि जिद्दीने आपला संसार करून बाबासाहेबांना चांगल्या प्रकारची शिक्षणात मदत करून आपल्या संसाराची कसलीही तक्रार त्यांच्या पुढे मांडली नाही एक आदर्श माता कशी असावी हा समाजापुढे खूप मोठा आदर्श त्यांनी निर्माण केला.
तसेच मुख्यालय डॉ.जवळगेकर सर मनोगत व्यक्त करताना म्हणाले, माता रमाईचे अवघे 38 ते 40 वर्षाच्या जीवनामध्ये त्यांनी अनेक दुःख सहन करून त्यांनी महान डॉ.बाबासाहेब आंबेडकर निर्माण करण्याचे काम त्यांनी केले. कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी भीमराव आंबेडकर यांना दिलेला फेटा एका कार्यक्रमांमध्ये माता रमाई ने परिधान करून गेल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी पाहिल्यानंतर त्यांना अनंत दुःख झाले होते. भीमराव आंबेडकर रमाईला पाहून आतल्या आत खूप रडत होते पण त्याच माता रमाईच्या त्यागामुळे आज आपल्या महिला लाखो रुपयाच्या साड्या परिधान करतात. हे कोणामुळे शक्य झाले तर फक्त रमाईच्या त्यागामुळेच शक्य झाले असे त्यांनी ठामपणे सांगितले.
अध्यक्ष बापूसाहेब सदाफुले हे मनोगत व्यक्त करताना म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रदेशात शिकण्यासाठी गेल्यानंतर रमाई खूप आजारी पडल्या परंतु त्याने बाबासाहेबांना आपल्या आजाराबद्दल कधीही त्यांच्याकडे तक्रार केली नाही कारण मी आजारी आहे हे समजल्या नंतर बाबासाहेब परदेशातून परत येतील आणि आणि त्याच्या अभ्यासामध्ये खंड पडेल म्हणून त्यांनी कधीही त्यांच्या आजाराबद्दल त्यांच्याकडे तक्रार केली नाही. माता रमाई होत्या म्हणूनच बाबासाहेब त्यांच्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे संघर्ष करून या भारत देशाला महान संविधान दिले असे त्यांनी ठामपणे सांगितले.
कार्याध्यक्ष योहान कानेपागुलू यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर ट्रेड युनियन अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांच्या नेतृत्वाखाली घेत असलेल्या उपक्रमाची उपस्थित मान्यवरांना माहिती देऊन सोलापूर महानगर पालिकेमधील १३१ कर्मचाऱ्यांना ट्रेड युनियन पाठपुराव्याच्या माध्यमातून सेवेत कायम करून उर्वरित २४९ बदली रोजंदारी कर्मचाऱ्यांना लवकरच न्याय देण्याचे काम ट्रेड युनियनच्या माध्यमातून केले जाईल असे ठामपणे सांगून रमाई जयंतीच्या सर्व उपस्थित मान्यवरांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी चांगदेव सोनवणे, सायमन गट्टू, राजरत्न फडतरे, यांनी सुद्धा प्रारंभी मनोगत व्यक्त करून उपस्थित कर्मचाऱ्यांना रमाई जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी या कार्यक्रमाला अधिकारी वर्ग ,कर्मचारी वर्ग बदली रोजंदारी सेवक ,मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल उपस्थित मान्यवरांचे आभार अध्यक्ष कामगार नेते बापूसाहेब सदाफुले यांनी मानले या कार्यक्रमाला महिला कर्मचार्यांची प्रचंड प्रामुख्याने उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ट्रेड युनियनचे प्रमुख संघटक राम चंदनशिवे, दिनेश बनसोडे,सोनबा सदाफुले अमोल शेवाळे, सुनील शिंदे,धनाजी लोंढे,नीलम गायकवाड, गोपालतळभंडारे, बिभीषण गायकवाड, चंद्रकांत सर्वगोड,संतोष गायकवाड, कुमार मोरे,नरेंद्र गडशेल्लु, मंगेश बनसोडे, अर्जुन तळभंडारे, सुरज बनसोडे, प्रदीप हजारे, प्रदीप शिंदे, जय सुरवसे, शशिकांत गायकवाड, अंबादास सरवदे, विकास निकाळजे, बाबा वडवराव, यांनी परिश्रम घेतले.