आंतर जिल्हा सराईत गुन्हेगाराकडून, घरफोडी चोरीचे ०६ गुन्हे उघडकीस आणुन, ३८.९ तोळे सोने व १७.८३५ किलो चांदीचे दागिने जप्त. शहर गुन्हे शाखेची कामगिरी.

सोलापूर : प्रतिनिधी
२० जून २०२४ रोजी, स.पो.नि. संदिप पाटील यांचे पथकास बातमीदारामार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्ड वरील घरफोडी चोरीतील आरोपी नामे राजकुमार विभुते हा मार्केट यार्ड परिसरात पहाटे ०५.०० वा. चे सुमारास संशयीतरित्या फिरत आहे. त्या प्राप्त बातमी प्रमाणे, स.पो.नि. संदिप पाटील व त्याचे पथकाने सराईत गुन्हेगार- राजकुमार पंडीत विभुते, वय-४२ वर्षे, रा. मु.पो. बोरामणी, ता. दक्षिण सोलापूर, जि. सोलापूर यास मार्केट यार्ड परिसरातुन ताब्यात घेतले. त्यानंतर, त्याचेकडे स.पो.नि. संदिप पाटील व त्यांचे तपास पथकाने, कौशल्यपूर्वक तपास केला असता, नमूद आरोपीने, जोडभावी पेठ पोलीस ठाणे, सोलापूर शहर गुरनं-१११/२०२४ भादंवि ४५४, ४५७, ३८० हा गुन्हा केल्याचे कबुली दिली. त्यानंतर, त्यास नमूद गुन्ह्यात अटक करून, गुन्ह्यातील गेलामाल हस्तगत करणेकामी त्याची पोलीस कोठडी रिमांड घेतली.
त्याचप्रमाणे, त्याने व त्याचा आणखी एक साथीदार असे दोघांनी मिळून, एप्रिल-२०२४ मध्ये बारामती ०२ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याचे कबुल करून, त्यातील चोरीचे दागिने काढून दिले आहेत. नमूद पोलीस कोठडी रिमांड मध्ये, नमूद आरोपीने, सन-२०२३ साली सोलापूर शहरात यापूर्वी, जोडभावी पेठ व फौजदार चावडी पोलीस ठाणेचे हद्दित आणखी ०३ घरफोडी चोरीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
शहर गुन्हे शाखेने, ०६ घरफोडी चोरीचे गुन्हे उघडकीस आणुन ३८९.३ ग्रॅम (३८.९ तोळे) सोन्याचे दागिने (किंमत रू.१६,०४,९००/-) व १७,८३५ ग्रॅम (१७ किलो ८३५ ग्रॅम) चांदीचे दागिने (किंमत रू.६,७३,५००/-) तसेच गुन्हा करणेसाठी वापरलेली निसान कंपनीची कार व चोरीचे सोन्या-चांदीचे दागिने वित्तळवण्याची (आटणी) मशिन व त्याकामी लागणारे साहित्य रक्कम रु.५,६३,०००/- असा एकुण रू.२८,४१,४००/- किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सदरची
कामगीरी एम. राज कुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर शहर, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, स.पो.नि/संदिप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार विजयकुमार वाळके, विद्यासागर मोहिते. तात्यासाहेब पाटील, गणेश शिंदे, चालक सतिश काटे, सायबर पो, स्टे, कडील प्रकाश गायकवाड व मछिद्र राठोड, यांनी केली आहे.