आमदार राणाजगजितसिंह पाटिल यांनी तळे हिप्परगा येथील श्री मशरूम गणपतीचे घेतले दर्शन

सोलापूर : प्रतिनिधी
श्री मशरूम गणपती जन्मोत्सवा निमित्त तळे हिप्परगा येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी माजी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी तसेचे सोलापुर जिला सरकारी वकील तथा सीबीआय चे विशेष सरकारी वकील प्रदीपसिंग राजपूत यांचा हस्ते महाआरती, गुलाल व महाप्रसाद वाटप करण्यात आले.
या प्रसंगी 7 ते 8 हजार भक्तानी महा प्रसादचा लाभ घेतला, पहाटे 4 ते 6 पंचामृत महाभिषेक षोडशोपचार पूजा 6 ते 7 सुवर्णा अलंकार पूजा 7 वा.ध्वजारोहण 7: 15 वा नित्य आरती नंतर श्री गणेशास पाळण्यात स्थानपन्न करने, 9 ते 12 अथर्वशीर्ष स्वःहाकार गणेश भजन, दुपारी 12 वा. महा आरती जन्मोत्सव, गुलालोत्सव, पाळना, अन्नकूट दुपारी 12:30 वाजता, महानैवाद्य 12:30 ते 6:00 महाप्रसाद वाटप, 6 ते 8 हरिपाठ सायंकाली 8:30 वा.महाआरती ने कार्यक्रमाची सांगता तुळजापुर चे नगराध्यक्ष आनंद कंदले यानी मंदिरात फूल सजावट सेवा करून श्री चरणी अर्पण केली.
या वेळी आमदार राणाजगजितसिंह पाटिल, राजशेखर हात्ती, रूद्रमणि हीरेमठ आदि उपस्थित होते. यावेळी मंदिराच्या वतीने सर्व मान्यवरांचा सम्मान करण्यात आला. वरील सर्व कार्यक्रमाचे आयोजन मंदिराचे पुजारी धनंजय पतंगे, संजय पतंगे यानी केले कार्यक्रम यशस्वी करने साठी मशरूम गणपती भक्त मंडळाचे अध्यक्ष राजू हौशेट्टी, बाबूराव शितोले, अमोल तांबे, विशाल सुरवसे, निलेश स्वामी, अर्जुन सुरवसे, विलास माळी सागर भंडारी, कुमार सुरवसे, दीपक देशमुख, गणेश हौशेट्टी, नागराज हौशेट्टी आदिने परिश्रम घेतले सर्वमान्यवरांचे व गणेश भक्ताचे आभार ईश्वर पतंगे, भैया पतंगे यानी मानले.