सोलापूरमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे पाटील यांना मातृशोक

सोलापूर : प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील यांच्या मातोश्री तसेच बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावच्या पहिल्या महिला सरपंच श्रीमती शांताबाई तुकाराम ठोंगे-पाटील यांचे आज सकाळी 6.30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात एक मुलगा एक मुलगी सुन नातवंडे असा परिवार असुन त्यांची अंत्ययात्रा आज सायंकाळी 4.00 वाजताच्या सुमारास मोदी येथील हिंदु स्मशानभूमी येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे.
बार्शी तालुक्यातील उपळाई ठोंगे गावच्या पहिल्या महिला सरपंच श्रीमती शांताबाई तुकाराम ठोंगे पाटील यांनी गावात नवनवीन योजना आणून सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांना अनेक सुविधा मिळवून दिल्या. त्यांच्या कामाचा आदर्श आजही तेथे गौरविला जातो. तरी त्यांच्या पवित्र आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.