मराठा सेवा संघ राज्यस्तरीय अधिवेशन संदर्भात नियोजन बैठक संपन्न

सोलापूर : प्रतिनिधी
सोलापूर जिल्हा मराठा सेवा संघाच्या सर्व कक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची मराठा सेवा संघ राज्यस्तरीय अधिवेशन अकलूज संदर्भात नियोजन करण्यासाठी सोलापूर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती.
यावेळी केंद्रीय सदस्य शिवश्री उत्तमराव माने, विभागीय अध्यक्ष शिवश्री प्रशांत पाटील, सोलापूर विभागाचे जिल्हाध्यक्ष डि.के. देशमुख, पंढरपूर विभागाचे जिल्हाध्यक्ष शिवश्री अमित निकम, पंढरपूर विभागाचे माजी अध्यक्ष टी. आर. पाटील, सोलापूर विभागाच्या जिजाऊ ब्रिगेडच्या माजी जिल्हाध्यक्ष निर्मला शेळवणे, शिवमती स्वाती पवार जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र,
पंढरपूर विभागाचे सचिव धनाजी मस्के, तालुकाध्यक्ष शिवश्री निलेश देशमुख माढा, सतीश काळे करमाळा, निनाद पाटील माळशिरस, माढा तालुका उपाध्यक्ष अरुण जगताप, बार्शी तालुका अध्यक्ष दिलीप सुरवसे, मंगळवेढा तालुकाध्यक्ष रामचंद्र हेंबाडे, वधू वर सूचक कक्षाचे दिलीप जाधव, शिक्षक कक्षाचे जिल्हा अध्यक्ष जीवन यादव, उद्योग कक्षाचे जिल्हा अध्यक्ष दत्ता शिंदे माढा, जिजाऊ ब्रिगेडच्या केंद्रीय सदस्य शिवमती अक्काताई माने उपाध्यक्ष मनीषा जाधव, शुभदा नागणे, जिल्हाध्यक्ष मनोरमा लावंड, साधना नागणे तसेच इतर कक्षाची पदाधिकारी उपस्थित होते.