श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने पालिका आयुक्तांना विविध मागण्यांचे दिलेले निवेदन

सोलापूर : प्रतिनिधी
श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्यावतीने श्री छत्रपति शिवाजी महाराजांची भव्य दिव्य पूर्णाकृतीची स्थापना डाळींबी आड, इंदिरा कन्या प्रशाला लगत, शिंदे चौक येथे शिवजयंती निमित्त करणेत येत असते. याठिकाणी मनपाकडून सालाबाद प्रमाणे मैदानाची साफसफाई करणे, मंडप टाकणे, रोलिंग करणे, मलमा टाकणे, रंगरंगोटी करणे, लायटींग करणे, कुस्तीचा आखाडा तयार करून देणे, प्रेक्षकांना बसण्यासाठी गॅलरी तयार करून मिळणे, डाळींबी आड मैदान यैथे शोभिवंत झाडे लावण्यात येणार आहेत त्यासाठी ट्री गार्ड लावून मिळावेत व दररोज डाळींबी आड येथील मुर्तीस व श्री छत्रपति शिवाजी चौक येथील अश्वारूढ पुतळयास दररोज सकाळ/ संध्याकाळ पुजेचे हार सोय करावी.
छत्रपति शिवाजी महाराज अश्वारूढ पुतळा येथे मंडप, मेघडंबरी, लाईटची सोय व स्टेज, लायटींग, स्पिकर, चौकातील तीनही बाजूस टॉवर उभे करून फोकस ची व्यवस्था करणे, सत्कारासाठी हाराची सोय करण्याबाबत आदेश निघणेस विनंती आहे.
मध्यवर्ती महामंडळाची सार्वजनिक य दि.१९ फेब्रुवारी रोजी मिरवणुक निघते त्याप्रसंगी छ. शिवाजी चौक येथे स्टेज, खुर्चा, स्पिकर, सत्कारासाठी लागणारे साहित्य इ. कामे त्या दिवशी पुर्ण करावीत व महामंडळास सहकार्य करावे ही विनंती.
छत्रपति शिवाजी चौक ते छत्रपति संभाजी महाराज चौक, तसेच नवीवेस पोलीस चौकी या मार्गावरील मधील डिव्हाईडर मधील आजोरा काढावा, रंगरंगोटी करावी, लाईट चालू करावेत, झाडाच्या फांद्या कट कराव्यात व रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत याबाबतचे निवेदन शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांना देण्यात आले.
यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, श्रीकांत डांगे, सुशील बंदपट्टे, राजन जाधव, माऊली पवार, भाऊसाहेब रोडगे, विजय पुकाळे, पंकज काटकर, महेश हनमे, विनोद भोसले, शिवा कामाठी, लता ढेरे, प्राजक्ता बागल, अंबादास शेळके, प्रीतम परदेशी, प्रकाश ननवरे, सचिन स्वामी, देविदास घुले, बसू कोळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.