सोलापूर जिल्हा मिटर रीडर संघटनेच्या आंदोलनास आणि त्यांच्या मागण्यास शिवसेनेच्या वतीने दिला जाहीर पाठिंबा

सोलापूर : प्रतिनिधी
कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगारांना वयाच्या सेवानिवृत्ती पर्यंत शाश्वत रोजगार देण्यात यावा, कंत्राटी विद्युत मीटर रीडर कामगारांना समान काम समान वेतन लागू करावे, किमान वेतन कायद्यांतर्गत सर्व मीटर रीडर कामगारांना किमान वेतन मिळावे यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी एम. एस. ई. डी. सी. एल मीटर रिडर कंत्राटी कामगार संघटना आणि सोलापूर जिल्हा मीटर रीडर संघटना यांच्या वतीने बेमुदत काम बंद आंदोलन करण्यात आले.
या आंदोलनास आणि रीडर संघटनेच्या सर्व मागण्यांना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने जाहीर पाठिंबा देण्यात आला त्या पाठिंबाचे पत्र देखील संघटनेला सुपूर्द करण्यात आले.
यावेळी शिवसेनेचे उपशहर प्रमुख सुरेश जगताप, शिवसेना विद्यार्थी सेनेचे नेते लहू गायकवाड, रिक्षा सेना शहराध्यक्ष बाळासाहेब पवार, उपशहर प्रमुख दत्ता खलाटे, विभाग प्रमुख अण्णा गवळी, शाखाप्रमुख राहुल परदेशी आणि शिवसैनिक उपस्थित होते.