शिधापत्रिकाधारकांना ई-केवायसी अनिवार्य

2 Min Read

सोलापूर : प्रतिनिधी

सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत जिल्ह्यातील रास्तभाव धान्य दुकानांमधून अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब लाभार्थ्यांना अन्नधान्याचे वितरण करण्यात येते. या लाभार्थ्यांचे आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करण्याच्या शासनाच्या सुचना आहेत. त्यानुसार सर्व शिधा पत्रिका धारकांनी आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करून घ्यावी असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केले आहे.

लाभार्थ्यांचं ई-केवायसी करण्याकरिता गावोगावी कॅम्प आयोजित केले आहे. या करिता शिधापत्रिकेतील अर्थात कुटुंबातील सर्व लाभार्थ्यांनी आपल्या नजीकच्या रास्तभाव धान्य दुकानांमध्ये प्रत्यक्ष आधार कार्ड दाखवून, अंगठ्याचा ठसा देऊन आधार प्रमाणीकरण ई-केवायसी करावयाचे आहे. सदरील प्रक्रिया दिनांक 15 फेब्रुवारीपर्यंत करावयाची असल्याने लाभार्थ्यांनी जवळच्या रास्तभाव धान्य दुकानामध्ये अथवा कॅम्पमध्ये जाऊन आपल्या अंगठ्याचा ठसा व आधार नंबर देऊन ई-केवायसी करावी. ई-केवायसी केले नाही, तर दिनांक 15 फेब्रुवारीनंतर धान्य दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी, त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी कॅम्प चा लाभ घ्यावा. या संदर्भात सर्व लाभार्थीं व रास्तभाव धान्य दुकानदार यांना दिनांक 15 फेब्रुवारीपुर्वी 100 टक्के कामकाज पुर्ण करण्याचे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.

तसेच जिल्ह्यातील सर्व रास्तभाव धान्य दुकानदारांना सुचित करण्यात येते की, त्यांनी प्रत्येक महिन्याच्या 7 तारखेस अन्नदिन साजरा करून लाभार्थ्यांना धान्य वाटप सुरू करावे. कोणत्याही परिस्थीतीमध्ये दर महिन्याच्या 15 तारखेपुर्वी सर्व लाभार्थ्यांना धान्य वाटप पुर्ण करावे. अशा सक्त सुचना देण्यात येत आहेत. तसेच वन नेशन वन रेशनकार्ड अंतर्गत राज्यातील लाभार्थी नजीकच्या कोणत्याही रास्तभाव दुकानामध्ये जाऊन अन्नधान्याची उचल करीत आहेत. त्या लाभार्थ्यांनी त्याच दुकानामध्ये ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा आपल्या गावी रास्तभाव धान्य दुकानात जाऊन ई-केवायसी करावी. केंद्र शासनाच्या ई-श्रम पोर्टलवरील नोंदणीकृत स्थलांतरीत, असंघटीत कामगार ज्यांच्याकडे अद्याप रेशनकार्ड नाही, अशा कामगारांना प्रचलित निकषानुसार विशेष मोहिमेअंतर्गत तातडीने शिधापत्रिका वितरीत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले आहेत. ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत स्थलांतरीत, असंघटीत कामगारांना जिल्ह्यातील सर्व तहसिल कार्यालयामध्ये सुरू आहे. त्यानुसार जया व्यक्तीनी स्वत:चे नाव ई-श्रम पोर्टलवर नोंदणीकृत केलेले आहे. मात्र अद्याप कोणत्याही प्रकारच्या शिधापत्रिकेचा लाभ नाही, अशा व्यक्तींनी आवश्यक त्या कागदपत्रांस जवळच्या तहसिल कार्यालयामध्ये संपर्क करून शिधापत्रिका प्राप्त करून घ्यावी. असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे यांनी केले आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!