
सोलापूर : प्रतिनिधी
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची असलेली अॅग्रिस्टॅक योजनेची अंमलबजावणी गतिमान करण्याची सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केली असून सध्या जिल्ह्यात बारा हजार पाचशे शेतकऱ्यांनी अॅग्रिस्टॅकची नोंदणी केल्याचीही माहिती त्यांनी दिली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभघेण्यासाठी अॅग्रिस्टॅक योजना महत्त्वाची आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्हा अॅग्रिस्टॅक योजनेंतर्गत शेतकरी ओळख क्रमांक दिला जात आहे. अॅग्रिस्टॅक योजनेतंर्गत फॉर्मर आयडी तयार करून घेण्यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी नजीकच्या सीएससी सेंटर तसेच जवळच्या तलाठी, ग्राम महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
किरण जमदाडे, तहसीलदार : दक्षिण सोलापूर
प्रशासनाकडून अॅग्रिस्टॅक योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे. दक्षिण सोलापूर तहसील कार्यालयाकडून आयोजित शिबिरांमध्ये चार हजारहून अधिक शेतकऱ्यां कडून अॅग्रिस्टॅकची नोंदणी झाली तसेच उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाकडून मंगळवार, ४ व बुधवार ५ फेब्रुवारीला शिबिरांचे आयोजन केले आहे.
शेतकरी यांनी आपले आधारकार्ड (मोबाईल नंबर लिंक असलेले) घेऊन आपले गावचे ग्राम महसूल अधिकारी, सीएससी चालक व महा ईसेवा चालक यांच्याशी संपर्क साधून शेतकरी ओळख क्रमांक तयार करुन घ्यावा, असे आवाहनही तहसीलदार नीलेश पाटील यांनी केले आहे.