क्राईम

एक तासाच्या आत घरपोडीचा गुन्हा उघड, सदर बाजार पोलीस स्टेशन गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

पोलीस अंमलदार सागर सरतापे यांच्या गोपनीय माहिती द्वारे एक तासाच्या आत घरपोडीचा गुन्हा उघड, 6,55,500/- रु.चा. माल आरोपीकडून जप्त

सोलापूर : प्रतिनिधी

सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर गु.र.नं. 294/2024 भा.द.वि. कलम 457,380,34 मधील फिर्यादी नामे हारुन जलालसाब करकम वय 74 वर्षे, व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक रा. 7/24 विद्यानगर दक्षिण सदर बझार सोलापूर हे बाहेरगावी गेले असता दिनांक 22/04/2024 रोजी रात्रौ 10.00 वा. ते दिनांक 23/04/2024 रोजीचे पहाटे 03.30 वा.चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने आमचे राहते घराचा बंद दरवाजा कशानेतरी उघडून आत प्रवेश करुन आमचे घराचे बेडरुमधील कपाटातील रोख रक्कम 2,75,000/- व एकूण 80.5 ग्रॅमसोन्याचे दागिने चोरुन नेले म्हणून वगैरे मजकुरची फिर्याद होती.

सदरचा दाखल गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस आयुक्त यांनी सक्त सुचना देऊन मार्गदर्शन केले आहे. सदरचा गुन्हा उघडकीस अणण्याचे दृष्टीने सदर बझार पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटिकरण पथकातील पोसई नितीन शिंदे यांनी त्यांचे अधिपत्याखालील पोना/ सागर सरतापे व इतर अंमलदार यांना बोलावून त्यांना सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सुचना दिल्या. सदरचे तपास पथक सदर गुन्ह्याचे घटनास्थळी जाऊन यातील फिर्यादीकडे गुन्ह्याचे तपासाचे अनुषंगाने विचारपूस करुन परत येत असताना पोलीस अंमलदार सागर सरतापे यांना सदरचा गुन्हा सदर बझार पोलीस ठाणे कडील रोहित लक्ष्मण बाबावाले याने त्याचे साथिदारांचे मदतीने केल्याची गोपनिय बातमी मिळाली की, त्याचा शोध घेणेकरीता सदरचे पथक जात असताना त्यांना सिध्दार्थ चौकात अभिलेखावरील गुन्हेगार नामे रोहित लक्ष्मण बाबावाले हा आम्हास पाहून त्याचे साथिदारासह पळून जाऊ लागला. त्यांचा पाठलाग त्यांना करुन पकडले व त्यांना सदर बझार पोलीस ठाणे, सोलापूर शहर येथे आणून, त्यांना विश्वासात घेऊन त्यांना त्यांची नावे विचारता त्यांनी त्यांची नावे 01) रोहित लक्ष्मण बाबावाले वय 25 रा. काळभैरव मठाजवळ, बापुजी नगर सोलापूर, 02) विशाल रमेश बाबावाले वय 27, रा. काळभैरव मठा जवळ, बापुजी नगर सोलापूर असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे वरील नमुद गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमे व सोन्याचे दागिनेबाबत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने नमुद दोन्ही निष्पन्न आरोपींना गुन्ह्याचे तपासात पोसई नितीन शिंदे यांनी अटक केली.

आज रोजी पुन्हा नमुद आरोपींकडे विचारपूस केली असता आरोपी नामे रोहित लक्ष्मण बाबावाले याने रोख रक्कम 2,53,000/- व सुमारे 2,00,000/- किमतीच्या 40 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या निवदेन पंचनाम्याने काढून दिल्या व आरोपी विशाल रमेश बाबावाले याने सुमारे 40.5 ग्रॅम वजानाचे सोन्याचे 02,02,500/- किमतीचे असे एकूण 80.5 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम 2,53,000/- असे 6,55,500/- रु. चा. माल जप्त केले आहेत.

सदरची कामगिरी एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, विजय कबाडे, पोलीस उपआयुक्त परिमंडळ, अजय परमार मा. सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग-2, अजित लकडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, भालचंद्र ढवळे पोलीस निरीक्षक (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोउपनि नितीन शिंदे, पोना/सागर सरतापे, पोहेकॉ औदुंबर आटोळे, पोहेकॉ संतोष मोरे, पोहेकॉ शहाजहान मुलाणी, पोहेकॉ राजेश चव्हाण, पोना/ लक्ष्मीकांत फुटाणे, पोकों / मल्लू बिराजदार, पोकों/ सागर गुंड, पोकों/सोमनाथ सुरवसे, पोकॉ/ अबरार दिंडोरे, पोकों/ हणमंत पुजारी, मपोहेकों / शोभा कुंभार, चालक पोहेकों/ नंदू व्हटकर, लक्ष्मण राठोड, पोना/ इरफान नदाफ, यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!