सोलापुरात नवीन आधुनिक बस स्थानक व्हावे, आमदार विजयकुमार देशमुख यांची परीवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

सोलापूर : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सोलापूर दौर्यावर आले असताना आमदार विजय देशमुख यांनी त्यांची भेट घेतली दरम्यान सोलापूर शहरा लगत अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ महाराजांचे धार्मिक तीर्थ क्षेत्र असून तसेच राज्याची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी व पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर व श्री क्षेत्र गाणगापूर अशा धार्मिक स्थळ असलेल्या गावास जोडणारे शहर असल्याने या तीर्थक्षेत्रास्थळी लाखों भाविक दर्शना साठी येत असतात हे बस स्थानक मध्यवर्थी ठिकाण आहे.
या तीर्थक्षेत्रास जाण्यासाठी बस स्थानकावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे वर्दळ असते. हे बस स्थानक खूप जुने असल्याने प्रवाशांचे गैरसोय होते. यामुळे नवीन आधुनिक बस स्थानक सोलापूर शहरातील मध्यवर्ती बसस्थानक बांधण्या करीता बैठक आयोजित करण्याचे आमदार विजय देशमुख यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन देण्यात आले.
प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, माजी सभागृह नेते संजय कोळी, माजी नगरसेवक अमर पुदाले, प्रसाद कुलकर्णी, देवीदास चेळेकर, प्रमोद मोरे व अधिकारी वर्ग आदी उपस्थित होते.